मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'निक जोनासची पत्नी' म्हटल्यानं प्रियांका चोप्रा भडकली, म्हणाली हे काय चाललंय

'निक जोनासची पत्नी' म्हटल्यानं प्रियांका चोप्रा भडकली, म्हणाली हे काय चाललंय

मोस्ट पॉवरफुल कपल निक जोनास आणि प्रियांका चोप्रा हे आजकाल अशा काही गोष्टी करत आहेत, त्यामुळे चाहते आश्चर्यचकित झालेत. अलीकडेच निक म्हणाला होता की, तो एक चांगला नवरा नाही, तर आता प्रियांका 'निक जोनासची बायको' (Nick Jonas wife) म्हटल्याने संतापली.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) गेल्या काही काळापासून निक जोनाससोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या नावाच्या मागील जोनासचे नाव काढलं होतं. तर आता तिला निकची पत्नी म्हणणं आवडलं नाही.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) यांची जोडी सर्वात रोमँटिक कपल म्हणून ओळखली जाते. या दोघांमधील प्रेम आणि बाँडिंग त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अदाकारीनं चाहत्यांचे मन जिंकणारी प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. नुकतेच या 'देसी गर्ल'ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पतीचे आडनाव जोनास काढून टाकले होते, त्यानंतर प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाबद्दल ऐकून त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांना प्रश्न पडला आहे की प्रियांकाचे निक आडनाव काढण्याचे कारण काय आहे? मोस्ट पॉवरफुल कपल निक जोनास आणि प्रियांका चोप्रा हे आजकाल अशा काही गोष्टी करत आहेत त्यामुळे चाहते आश्चर्यचकित झालेत. अलीकडेच निक म्हणाला होता की, तो एक चांगला नवरा नाही, तर आता प्रियांका 'निक जोनासची बायको' (Nick Jonas wife) म्हटल्याने संतापली. तिने इंस्टाग्रामवर काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत ज्यात तिला 'निक जोनासची पत्नी' असे संबोधण्यात आले आहे.

हे वाचा - अंकिता लोखंडेने रिसेप्शन केलं रद्द; हनिमूनदेखील पुढे ढकलावं लागलं, जाणून घ्या कारण…

प्रियांका चोप्राने इन्स्टावर लिहिलंय की, 'हे खूपच गंमतशीर आहे की, मी जगातील सर्वात प्रतिष्ठित फ्रेंचायझीचे प्रमोशन करत आहे आणि मला अजूनही कोणाची तरी पत्नी म्हणून पाहिलं जात आहे. यासाठी प्रियांका चोप्राने तिच्या बायोमध्‍ये तिची IDMB लिंक जोडावी का असे विचारले आहे. महिलांना अशी वागणूक कशी दिली जाते, असा सवालही तिने केला आहे. म्हणजेच कामाच्या ठिकाणी तिला कोणाची तरी पत्नी म्हणणे अजिबात आवडलेले नाही.

हे वाचा - अभिनेत्री Ananya Panday ग्लॅमरस Look मुळं आली चर्चेत, पाहा PHOTOS

या पोस्टमध्ये प्रियांका चोप्राने तिचा पती निक जोनासलाही टॅग केले आहे. भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने यंदाही मोस्ट अॅडमायर्ड वुमन-2021 च्या यादीत विशेष स्थान निर्माण केलं आहे. या वर्षी टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवणारी प्रियांका चोप्रा ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.

First published:

Tags: Nick jonas, Priyanka chopra