VIDEO : निकच्या सतर्कतेमुळे मोठ्या दुर्घटनेतून वाचली प्रियांका चोप्रा Priyanka Chopra | Nick Jonas

VIDEO : निकच्या सतर्कतेमुळे मोठ्या दुर्घटनेतून वाचली प्रियांका चोप्रा Priyanka Chopra | Nick Jonas

Priyanka Chopra | Nick Jonas | पॅरिसमधील एका बोट पार्टी दरम्यान प्रियांकासोबत ही घटना घडली. ज्यात निकच्या सतर्कतेमुळे तिच्यासोबत दुर्घटना होता होता राहिली.

  • Share this:

मुंबई, 28 जून :बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनस सोबत सध्या पॅरीसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. याचे अनेक फोटोसोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र निकच्या सतर्कतेमुळे प्रियांका चोप्रा नुकत्याच एक मोठ्या दुर्घटनेतून वाचली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिमध्ये ही गोष्ट समोर आली. हा व्हिडिओ समोर आल्यावर निक जर त्या ठिकाणी नसता तर प्रियांका एका दुर्घटनेची शिकार झाली असती. त्यामुळे निकच्या सतर्कतेचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.

कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का

सध्या प्रियांका चोप्रा पॅरिसमध्ये असून तिच्यासोबत ही घटना एका बोट पार्टी दरम्यान घडली. या ठिकाणी निक- प्रियांका निकचा भाऊ जो जोनसच्या वेडिंगसाठी आले आहेत. दरम्यानं त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारासाठी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात निक आणि प्रियांकाही सहभागी झाले होते. मात्र या पार्टीमध्ये बोटच्या साइडला उभ्या असलेल्या प्रियांकाचा तोल गेला मात्र समोरच उभ्या असेलेल्या निकनं तिला सावरलं आणि प्रियांका पाण्यात पडता पडता वाचली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इम्रान खानची बायको डिप्रेशनमध्ये, ट्रिटमेन्टसाठी दररोज जातेय वेलनेस सेंटरमध्ये

निक प्रियांकाच्या बाबतीत नेहमीच खूप सतर्क असतो. यावेळीही त्यानं जर प्रियांकाला वेळीच पकडलं नसतं तर प्रियांका पाण्यात पडली असती ज्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे सध्या निकचं सर्वजण कौतुक करत आहेत. एक परफेक्ट पती म्हणून निक नेहमीच स्वतःला सिद्ध करताना दिसतो. पॅरिसनंतर निक-प्रियांका साउथ फ्रान्सला रवाना होणार आहेत. ज्या ठिकाणी जो आणि सोफी लग्नाचे सर्व रितीरिवाज पार पाडतील.

VIDEO: सामना पाहायला गेलेल्या सैफ अली खानचा पाकिस्तानी चाहत्याने उडवली थट्टा

 

View this post on Instagram

 

It’s in the air.. ❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. निकचा मिड वे हा सिनेमा यावर्षी 8 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. याची माहिती निकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नुकतीच दिली आहे.

===================================================================

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

First published: June 28, 2019, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading