मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Priyanka Chopra: आता बास! भारतात परतताच बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावाविषयी प्रियांकाचं मोठं वक्तव्य

Priyanka Chopra: आता बास! भारतात परतताच बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावाविषयी प्रियांकाचं मोठं वक्तव्य

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा तब्बल 3 वर्षांनी भारतात परतली आहे. आता भारतात परतताच भारतीय चित्रपटसृष्टीवर भाष्य केलं आहे. अलीकडेच प्रियांकाने तिच्या चित्रपटांमधील भूमिकेबद्दल तिने तिचं मत मांडलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 05 नोव्हेंबर :प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.  ती  तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे कायम चर्चेत असते. आता प्रियांका चोप्रा तब्बल 3 वर्षांनी भारतात परतली आहे. तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत याविषयी अपडेट दिली आहे. इथे येताच ती सतत इव्हेंट्समध्ये सहभागी होत आहे. भारतात परतताच भारतीय चित्रपटसृष्टीवर भाष्य केलं आहे. अलीकडेच प्रियांकाने तिच्या चित्रपटांमधील भूमिकेबद्दल तिने तिचं मत मांडलं आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत प्रियांकाने भारतीय चित्रपटसृष्टीमधील भेदभावांवर भाष्य केलं आहे. प्रियांका चोप्राने बॉलिवूडसहित हॉलिवूडमध्येही नाव कमवाल आहे. आता ती भारतात येऊन येथील चित्रपटसुष्टीतील भेदभाव नष्ट करू इच्छिते. या मुद्द्यावर भाष्य करताना प्रियांका चोप्रा म्हणते की तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत नायकाच्या दुय्यम भूमिका केल्या आहेत, आता ती अशा भूमिका करणार आहे ज्यामध्ये महिलांची भूमिका प्रमुख असेल आणि चित्रपटाशी संबंधित निर्णय देखील महिलाच घेतील.

हेही वाचा - Bhagyashree: 'आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं पण...'; पतीवरील गंभीर शस्त्रक्रियेनंतर भाग्यश्रीची पोस्ट व्हायरल

प्रियंका चोप्रा म्हणाली की तिचा आगामी चित्रपट 'जी ले जरा' या बाबतीत नायिकांसाठी उपयुक्त ठरेल. प्रियांका चोप्रा 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट एका रोड ट्रिपवर आधारित आहे. प्रियांका चोप्रा म्हणते, ''मी माझ्या कारकिर्दीत बराच काळ घालवला आहे जिथे आपण नेहमी पुरुषांपेक्षा दुय्यम आहोत. चित्रपटाचे चित्रीकरण कुठे करायचे आहे, कोणाला कास्ट करायचे आहे आणि काय चालले आहे, हे सर्व निर्णय नायक घेतात. हे खूप कंटाळवाणे आहे. आपण आता अशा काळात आहोत जिथे महिलांना स्वतःच्या जगण्याचा अधिकार मिळायला हवा.''

प्रियांका चोप्राने अलीकडेच पीटीआयशी संवाद साधला. यादरम्यान ती म्हणाले, 'मी माझ्या कारकिर्दीतील बराच काळ केवळ दुय्यम भूमिका करण्यात घालवला आहे. जिथे नायक मुख्य भूमिकेत असायचा आणि अभिनेत्री तिथे फक्त समर्थनासाठी. शूटिंग कुठे करायचे हे हिरोच ठरवायचे. कोणाला कास्ट करायचे? आणि काय होणार आहे? पण आता आपण अशा टप्प्यात आहोत जिथे स्त्रिया स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. अशा परिस्थितीत आता चित्रपटांबाबतही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

फरहान अख्तर 'जी ले जरा' दिग्दर्शित करत आहे. नुकत्याच झालेल्या संभाषणात प्रियांकाने असेही सांगितले की, 'झीर ले जरा' या चित्रपटाबाबत प्रियांकाच्या मनात काही गोष्टी आल्या आणि त्यानंतर तिने आलिया आणि कतरिनाशी संवाद साधला. प्रियांका चोप्राने सांगितले की, फरहान अख्तरच्या आधी तिने आलिया आणि कतरिनाशी बोलले होते.

आमच्या पिढीतील नायिकांनी आगामी पिढीतील महिलांना सशक्त कथानक असलेले चित्रपट बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असे प्रियांका चोप्राचे मत आहे. ती म्हणाली, 'माझ्या पिढीतील नायिकांनी पुढच्या पिढीसाठी दरवाजे उघडले आहेत. बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करणारा आणि आमचा असा चित्रपट बनवण्यासाठी मला माझ्या मित्रांना सोबत घेऊन जायचे होते. पुढच्या वर्षी आम्ही 'जी ले जरा'चे शूटिंग सुरू करू अशी आशा आहे.''

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Priyanka chopra