Priyanka Chopraने याआधीच केला होता बाळाबाबत खुलासा, VIDEO आला समोर
Priyanka Chopraने याआधीच केला होता बाळाबाबत खुलासा, VIDEO आला समोर
Priyanka Chopra
अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) नुकताच सरोगेसीच्या आधारे आईबाबा बनले आहेत. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली होती.
नवी दिल्ली, 23 जानेवारी: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) नुकताच सरोगेसीच्या आधारे आईबाबा बनले आहेत. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली होती. दरम्यान, एक व्हिडीओ सध्या समोर आला ज्यामध्ये प्रियांकाने बाळासंदर्भात माहिती दिली होती.
दोन दिवसांपूर्वी, प्रियांका चोप्राने इन्स्टाग्राम पोस्टवरून आपल्या घरात सरोगेसीद्वारे बाळाचं आगमन झाल्याचं सांगितलं होतं. परंतु आपल्या घरात छोटा पाहुणा आला ली पाहुनी याचा खुलासा अभिनेत्रीने केलेला नव्हता. परंतु US विकलीच्या रिपोर्टनुसार अभिनेत्री आता लेकीची आई झाल्याचं म्हटलं आहे.
अशातच प्रियांकाचा एक जुना व्हिडीओ समोर (Priyanka Chopra Daughter Video) आला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या लेकीसंदर्भात बोलताना दिसत आहे. तिचा व्हायरल होणारा व्हिडीओ 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स' प्रमोशन वेळचा आहे. डिसेंबर 2021 मध्ये प्रमोशनदरम्यान आपल्या लेकीसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी नवा ट्रेंड सेट करणार असल्याचे म्हटले होते.
सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून तिच्या बोलण्यावरुन चाहते अनेक तर्क वितर्क लावत आहेत. या व्हिडीओमध्येच प्रियांकाने सरोगेट करणारे बाळ हे मुलगी असल्याचा खुलासा केला होता.
त्यावेळी तिने चुकून माझ्या मुलीसाठी किंवा माझ्या मुलांसाठी तसेच पुढच्या पिढीसाठी जे आमच्यासाठी ठरवलेली काचेची घरे बांधायला आवडणार नाहीत. असे सूचक वक्तव्य केले होते.
तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला माहिती होतं का बेबी गर्ल येणार आहे. तर दुसर्या युजरने लिहिले, " माझ्या बाळाऐवजी 'माझी मुलगी' असे म्हटल्याने अरे व्वा, अशा शब्दात कौतुक केले."
प्रियांका चोप्रा पोस्ट-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची गुड न्यूज शेअर केली होती. प्रियांकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'आम्ही सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. याबाबतची बातमी देताना आम्हाला खूप आनंद होतोय. या आनंदाच्या आणि विशेष क्षणात आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत आहोत'. या पोस्टनंतर अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.