प्रियांकाच्या या ड्रेसची टि्वटरकरांनी उडवली खिल्ली

प्रियांकाच्या या ड्रेसची टि्वटरकरांनी उडवली खिल्ली

प्रियांकाच्या या स्पेशल ड्रेसमुळे तीची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. ट्विटरवर "कपडा बचाओ" असा हॅशटॅग वापरून लोकांनी तिच्या ड्रेसची खिल्ली उडवली.

  • Share this:

02 मे : बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा न्युयॉर्कमध्ये पार पडलेल्या मेट गाला 2017 च्या रेड कारपेटवर खूपच स्टाइलिश अंदाजात पहायला मिळाली.   पण या कार्यक्रमात प्रियांकाच्या या स्पेशल ड्रेसमुळे तीची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. ट्विटरवर "कपडा बचाओ" असा हॅशटॅग वापरून लोकांनी तिच्या ड्रेसची खिल्ली उडवली.

प्रियांकाने रॉल्फ लॉरेन द्वारा डिझाईन केलेला खाकी रंगाचा ट्रेंच कोर्ट गाऊन घातला होता. जो मागच्या बाजूने खूपच लांब होता आणि या ड्रेसवर मॅचिंग असा लांब बूट ही परिधान केला होता.

एकीकडे अमेरिकेची मीडिया प्रियांकाच्या हटक्या लुकची प्रशंसा करत होती. तरच इकडे सोशल मीडियावर प्रियांकाच्या लुकवर आणि तिने घातलेल्या गाऊनवर खिल्ली आणि जोक्स व्हायरल होत होते.

या कार्यक्रमात प्रियांकाच्या सोबतीला दीपिका पदुकोण पाहायला मिळाली. दीपिका क्रीमी रंगाच्या आऊटफिटमध्ये होती.दीपिकाचा प्रिंसेस लुक हैरी जोश द्वारा करण्यात आला होता.

सध्या आपली मिस वर्ल्ड बेवॉच या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे. हा चित्रपट 26 मे ला आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रियांकाच्या जोडीला 'डब्लू डब्लू ई' सुपरस्टार 'द रॉक' ड्वेन जॉनसन हा मुख्य भूमिकेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 08:11 PM IST

ताज्या बातम्या