कपड्यांमुळे प्रियांकाच्या चोप्रा झाली पुन्हा एकदा ट्रोल, नेटकरी म्हणतात हा तर RSS स्वॅग

कपड्यांमुळे प्रियांकाच्या चोप्रा झाली पुन्हा एकदा ट्रोल, नेटकरी म्हणतात हा तर RSS स्वॅग

Priyanka chopra troll प्रियांका कोणत्याही रंगाचे कपडे व्यवस्थित कॅरी करते आणि त्याला स्टायलिश लुक देते. असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिची ड्रेसिंग स्टाइल, कधी सिनेमा तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट. आत्ताही अशाच एका कारणानं प्रियांका चर्चेत आली आहे. प्रियांकाची ड्रेसिंग स्टाइल नेहमीच हटके असते. पण अनेकदा ड्रेसमुळे तिला ट्रोल व्हावं लागतं. आताही काहीसं असंच घडलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या काही फोटोमधील प्रियांकाचा ड्रेस पाहिल्यावर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. पण असं काय आहे या ड्रेसमध्ये ज्यामुळे प्रियांका पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

'माझी फिगर पाहा,' आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने भाजपच्या महिला नेत्या भडकल्या

View this post on Instagram

That kinda day.. ❤️#husbandappreciation

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

सोशल मीडियावर व्हायल होत असलेले प्रियांकाचे हे फोटो तिच्या एक फॅन पेज वरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा ब्लॅक टॉप आणि खाकी शॉर्ट पॅन्टमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या फोटोवरून प्रियांकाला ट्रोल करायला सुरुवात केली. तिच्या खाकी शॉर्ट्समुळे प्रियांकाला RSS ची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हटलं जात आहे. एका युजरनं म्हटलं, प्रियांका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य बनली आहे का? तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, प्रियांका RSSच्या मिटिंगसाठी जात आहे. खाकी पॅन्ट हा RSSचा गणवेश असल्यानं प्रियांकाच्या पॅन्टवरून तिला खूप ट्रोल केलं जात आहे.

माजी मिस इंडियासोबत झाले असे काही की तुम्हालाही येईल तिची दया

View this post on Instagram

The couple we Stan

A post shared by Priyanka Chopra Fans zone (@priyanka_chopra_fans_zone) on

प्रियांकाच्या चाहत्यांनी मात्र तिच्या या लुकचं कौतुक केलं आहे. प्रियांका कोणत्याही रंगाचे कपडे व्यवस्थित कॅरी करते आणि त्याला स्टायलिश लुक देते. असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. या ड्रेसमध्ये प्रियांका न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर पती निक जोनससोबत फिरताना दिसली. याआधी निक जोनसही लग्नानंतर एअरपोर्टवर खाकी आउटफिटमध्ये दिसला होता आणि त्या ड्रेसमुळे निकला सुद्धा ट्रोल करण्यात आलं होतं.

हृतिकची बहीण सुनैना रोशन म्हणाली, माझं समर्थन कंगनाला!

=============================================================

VIDEO: अनोखा प्रयोग! विद्यार्थ्यांनी लावला मल्टी-स्पेशालिस्ट सायकला शोध

First published: June 19, 2019, 3:13 PM IST

ताज्या बातम्या