अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) सध्या जर्मनीला गेली आहे. तिथे तिच्या नव्या हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. हा सिनेमा पुढच्याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बर्लिन, 22 ऑक्टोबर: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) बॉलिवूडसोबतच हॉलिवूडदेखील गाजवत आहे. सध्या ही देसी गर्ल आपल्या नव्या फिल्मच्या शूटिंगसाठी जर्मलीना गेली आहे. बर्लिंनच्या गल्लांमधून रपेट मारतानाचे फोटो प्रियांकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत तिचा कुत्राही आहे. पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये प्रियांका खुलून दिसत आहे.
प्रियांका चोप्रा तिच्या मॅट्रिक्स 4 (Matrix 4) या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी जर्मनीला गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॅट्रिक्स 4 हा सायन्स फिक्शन मूव्ही आहे. या प्रियांकाची भूमिका अत्यंत दमदार आहे. मॅट्रिक्स 4मध्ये प्रियांकासोबत कियानू रिव्ह्ज (Keanu Reeves), कॅरी अॅनी मॉस (Carrie Anne Moss)ही झळकणार आहेत.
कोरोना व्हायरसचा फटका प्रियांकाच्या या फिल्मला बसला आहे. कोरोनामुळे मॅट्रिक्स 4चं शूटिंग पुढे ढकलावं लागलं होतं. या सिनेमाच्या चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण, हा सिनेमा डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. एकीकडे प्रियांका बर्लिनमध्ये मस्तपैकी फिरताना दिसत आहे तर दुसरीकडे तिचा सहकलाकार कियानू रिव्ह्जसुद्धा त्यांच्या गर्लंफ्रेंडसोबत भटकताना दिसून आला. त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मॅट्रिक्स 4 या हॉलिवूड सिनेमासोबतच प्रियांका चोप्रा काही बॉलिवूड सिनेमांमध्येही झळकणार आहे.