प्रियांका चोप्राने दिलं आलिया भट्टला दिलं 'हे' आयुष्यभराचं दु:ख

प्रियांका चोप्राने दिलं आलिया भट्टला दिलं 'हे' आयुष्यभराचं दु:ख

अभिनेत्री आलिया भट्टने दीपिका आणि अनुष्काच्या समक्ष व्यक्त केलेला सिक्रेट ड्रीम रोल प्रत्यक्षात साकारणार आहे प्रियांका चोप्रा. आता हा सल आलियाला आयुष्यभर पुरणार का?

  • Share this:

मुंबई, 31 जानेवारी : अभिनेत्री प्रियांका चोप्राने लग्नानंतर हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये अनेक दमदार सिनेमे करणार आहे. प्रियांका आता सध्या हॉलिवूडच्या 'इजंट इट रोमँटिक' सिनेमात काम करत असल्याचं तिने एका टॉक शोमध्ये सांगितलं आहे. याचवेळी प्रियांकाने तिच्या आगामी सिनेमाचा उलगडा केला. आता यात नवीन ते काय? याचा आलियाशी काय संबंध? तर तो असा...

आलिया भट्टने नुकतीच News18ला मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने आपल्याला कुणाची व्यक्तिरेखा साकारावीशी वाटते, ड्रीम रोल कुठला याविषयी सांगितलं होतं. आलिया भट्टला आयुष्यात एक भूमिका साकारणं हे तिचं स्वप्न असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. न्यूज 18 चे राजीव मसंद यांच्या टॉक शोमध्ये बॉलिवूडमधील तारकांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राणी मुखर्जी, तब्बू, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, तापसी पन्नू आणि आलिया भट्ट हजर होत्या. त्यावेळी राजीव मसंद यांनी आलियाला तिच्या ड्रिम प्रोजेक्टबद्दल विचारलं. तेव्हा तिला भविष्यात माँ आनंदी शीला यांची भूमिका करायला आवडेल असं म्हटलं.

माँ शीला यांच्या भूमिकेवर आता अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपलं नावं कोरलं आहे.प्रसिद्ध आणि वादग्रस्त आध्यात्मिक गुरू ओशो यांच्या शिष्या माँ आनंद शीला यांची भूमिका प्रियांका करणार असल्याची माहिती समोर आली आहे. माँ शीला या भारतात जन्मलेल्या अमेरिकन नागरिक आहेत. त्या रजनीश चळवळीतील प्रवक्त्या होत्या. माँ आनंद शीला यांच्यावर अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप  एकेकाळी करण्यात आला होता. अशा वादग्रस्त पण प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनावर आता चित्रपट तयार होत आहे आणि ती भूमिका अभिनेत्री प्रियांका बजावणार असल्यातं समजलं आहे. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत दोन सिनेमे केले असून तिसरा 'इजंट इट रोमँटिक' मध्ये ती व्यग्र आहे. माँ आनंदी शीला यांच्या सिनेमावर प्रियांकाचं नावं शिक्कामोर्तब झाल्याने हा तिचा चौथा हॉलिवूड सिनेमा होणार आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना प्रियांकाने सांगितलं की, 'मी सध्या बॅरी लेव्हिगसनबरोबर एका प्रोजेक्टसंदर्भात बोलत आहे. हा चित्रपट भारताच्या आध्यात्मिक गुरू ओशो यांची शिष्या माँ आनंदी शीला यांच्यावर आधारित असेल'

First published: January 31, 2019, 4:53 PM IST

ताज्या बातम्या