प्रियांका चोप्रा होणार आता डॉ. प्रियांका चोप्रा!

प्रियांका चोप्रा होणार आता डॉ. प्रियांका चोप्रा!

सूत्रांच्या माहितीनुसार, बरेली इंटरनॅशनल विद्यापीठानं प्रियांका चोप्राला डॉक्टर या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

23 डिसेंबर : ग्लोबल आयकॉन असलेली प्रियांका चोप्रा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी नुकतीच भारतात परतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बरेली इंटरनॅशनल विद्यापीठानं प्रियांका चोप्राला डॉक्टर या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या सगळ्यांच्या चाहती प्रियांका चोप्राला बरेली इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलपती डॉ. केशव कुमार अग्रवाल यांच्या हस्ते हा किताब देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. या कार्यक्रमासाठी डॉ. हर्षवर्धन आणि उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांचीही खास उपस्थिती असणार आहे.

प्रियांका चोप्राला ही पदवी बरेली इंटरनॅशनल विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेकडून देण्यात येणार आहे. प्रियांकासाठी बरेलीकडून या किताब खूप खास असणार आहे कारण तब्बल पाच वर्षांनी ती तिच्या गावी जाणार आहे. त्यामुळे कुलपतींकडून प्रियांकासाठी एक स्मृतीचिन्ह ही देण्यात येणार आहे.

प्रियांकाला हा किताब मिळणार असल्यामुळे तिची आई मधू चोप्राही खूप खुश आहे.

First published: December 23, 2017, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading