मुंबई, 11 जानेवारी: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि गायक निक जोनास (Nick Jonas) यांची जगभरात 'आऊटस्टँडिंग कपल' (Outstanding Couple) अशी ओळख आहे. नुकतंच प्रियंका आणि निकने लग्नाची 2 वर्ष पूर्ण केली. प्रियंका आणि निक सध्या सुखी संसार करत असले तरी दोघांमध्येही बऱ्याच गोष्टीत भिन्नता आहे. निक आणि प्रियांकामध्ये फक्त सांस्कृतिकच नाही तर त्यांच्या वयातही खूप अंतर आहे. प्रियांका निकपेक्षा जवळपास 10 वर्ष मोठी असून कायमच त्यांच्या वयातील अंतर चर्चेचा विषय ठरला आहे. पण आता लग्नानंतर पहिल्यांदाच प्रियांकाने तिच्या आणि निकमध्ये असलेल्या वयातील अंतरावर मौन सोडले आहे.
एका परदेशी वृत्तपत्राला मुलाखत देत असताना प्रियांका म्हणाली, नात्यात एकमेकांमध्ये फरक किंवा साम्य शोधण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं किंवा आवडीनिवडी जाणून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये प्रियंका आणि निक जोनासचा विवाह सोहळा पार पडला. ट्विन सेरीमोनीमध्ये दोघांनी एकमेकांशी पाश्चिमात्य पद्धतीने लग्न केले. प्रियंका आणि निकचा विवाह सोहळ्यामध्ये दोन्ही संस्कृतींच्या विधींचे पालन केले गेले.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव असतात. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसाठी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात. लंडनमध्ये प्रियंकाने नुकतंच तिच्या आगामी ‘टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Nick jonas, Priyanka chopra