Farmer Protest: आणखी एका सेलिब्रिटीचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली...

Farmer Protest: आणखी एका सेलिब्रिटीचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली...

दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्राही (Priyanka Chopra) शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर: देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिलजीत दोसांझ, मिक्का सिंह, स्वरा भास्कर असे सेलिब्रिटी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. आता त्यामध्ये आणखी एका सेलिब्रिटीचं नाव जोडलं गेलं आहे. त्या सेलिब्रिटीचं नाव आहे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra).

काय आहे प्रियांकाचं ट्वीट?

देसी गर्ल प्रियांका चोप्राने ट्वीट केलं आहे की,  “आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे”.  विशेष म्हणजे हे ट्वीट दिलजीत दोसांझने रिट्विट केलं आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय झालं आहे. 8 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.

या आंदोलनाला आता पुरस्कार वापसीचंही स्वरुप आले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (Prakash Singh Badal) यांनी या कायद्याच्या निषेधार्थ काही दिवसांपूर्वीच पद्मविभूषण पुरस्कार सरकारला परत दिला. आता या प्रकरणात बॉक्सर विजेंदर सिंहने (Boxer Vijender Singh) देखील उडी घेतली आहे. सरकारने विधेयक मागे घेतले नाही तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khel Ratna Award) परत देण्याचा इशारा विजेंदरने दिला आहे. विजेंदरने काँग्रेसच्या तिकिटावर मागील लोकसभा निवडणूक देखील लढवली होती.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 7, 2020, 1:06 PM IST

ताज्या बातम्या