बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिलाही लॉकडाऊनच्या काळात गुगलवर 19 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून कतरिना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. याशिवाय मेल स्टार्स बद्दल बोलायचं तर अभिनेता सलमान खानचं नाव गुगलवर सर्वाधिक म्हणजे 21 लाखवेळा सर्च करण्यात आलं. अर्थात टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा हा आकडा फारच कमी आहे. मात्र मेल स्टार्समध्ये सलमान अव्वल आहे. अभिनेत्याला पत्नीनं दिली थेट घरातून हाकलून देण्याची धमकी, पाहा नेमकं काय घडलंView this post on Instagram
मेल सेलिब्रेटींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आहे. आपल्या बॅटिंगने मैदानावर करोडो लोकांची मनं जिंकणारा विराट त्याच्या स्टाइल आणि लुक्ससाठी खूप फेमस आहे. लॉकडाऊनमध्ये विराटला 20 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ग्रीक गॉड अर्थात अभिनेता ऋतिक रोशनचं नाव आहे. ऋतिकला 13 लाख वेळा गुगलवर सर्च करण्यात आलं आहे. कोरोना योद्धे आहेत 'पाठकबाईं'चे आई-वडील; अक्षया देवधरबरोबर दिलखुलास गप्पाView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Priyanka chopra, Sunny Leone