Home /News /entertainment /

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडली प्रियांका चोप्रा, Photo शेअर करुन म्हणाली...

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडली प्रियांका चोप्रा, Photo शेअर करुन म्हणाली...

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सेल्फ क्वारंटाईन असेलेली प्रियांका आज जवळपास 2 महिन्यांनंतर घरातून बाहेर पडली आहे.

  मुंबई, 12 मे : चीनच्या वूहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. ज्यामुळे जवळापास सर्वच देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्यामुळे सर्वांना आपल्या घरी राहणं सक्तीचं झालं आहे. नेहमी बीझी राहणारे बॉलिवूड सेलिब्रेटींकडे सुद्धा सध्या बराच मोकळा वेळ आहे. त्यामुळे सर्वच सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुद्धा सध्या सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. सध्या ती पती निक जोनससोबत लॉस एंजिलिसमध्ये सेल्फ क्वारंटाईन आहे. पण आता 2 महिन्यांनंतर ती पहिल्यांदाच घराबाहेर पडली आहे. बराच काळ कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सेल्फ क्वारंटाईन असेलेली प्रियांका आज जवळपास 2 महिन्यांनंतर घरातून बाहेर पडली आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. तिनं मास्क लावलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, डोळे कधीच शांत नसतात. दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच घरातून बाहेर पडले आहे. शिल्पा शेट्टीनं या आजारमुळे घेतली सरोगसीची मदत, अनेकदा झाला होता गर्भपात
  View this post on Instagram

  Eyes are never quiet. #FirstDayOutIn2Months Thanks for the masks @avoyermagyan

  A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

  दरम्यान प्रियांकानं या पोस्टमध्ये लॉकडाऊन असतानाही ती घरातून बाहेर का पडली याची माहिती मात्र दिलेली नाही. पण कोणत्या तरी अत्यावश्यका कामासाठीच ती घरातून बाहेर पडली असावी असं म्हटलं जात आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत तिला घरातून बाहेर पडण्याचं कारण विचारलं आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातील हे गाव आता 'हिरोची वाडी', इरफानच्या प्रेमाखातर गावकऱ्यांचा निर्णय काही दिवसांपूर्वी प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. ज्यात एक लहानगी कृष्णा प्रियांका चोप्राचा मेकअप करताना दिसत होती. पहिल्या फोटोमध्ये प्रियांकानं क्राऊन घातला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये कृष्णा प्रियांकाला आयमेकअप करताना दिसत आहे आणि तिसऱ्या फोटोमध्ये ती प्रियांकाला लिपस्टिक आणि आयलायनर लावताना दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना प्रियांकानं लिहिलं, 'मे महिन्याचा पहिला सोमवार यावर्षीची थीम आहे प्रीटी प्रीटी प्रिन्सेस.' सोपं नव्हतं श्वेताचं लाइफ, मुलीनं सांगितलं घटस्फोटानंतर कशी होती आईची अवस्था
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Priyanka chopra

  पुढील बातम्या