युट्यूबद्वारे प्रियांका चोप्रा सुरू करणार ट्रॅव्हल शो ! 'हे' आहे नाव

युट्यूबद्वारे प्रियांका चोप्रा सुरू करणार ट्रॅव्हल शो ! 'हे' आहे नाव

हॉलिवूडमधले ड्वेन जॉन्सन आणि विल स्मिथसारखे मोठे अभिनेते सोशल मीडियाकडे वळल्यानंतर प्रियांकानेही युट्यूबवर आपली नवा शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

09 मे : प्रियांका चोप्रा लवकरच तिचा ट्रॅव्हल शो सुरू करणारे. हॉलिवूडमधले ड्वेन जॉन्सन आणि विल स्मिथसारखे मोठे अभिनेते सोशल मीडियाकडे वळल्यानंतर प्रियांकानेही युट्यूबवर आपली नवा शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

'इफ आय कूड टेल यू जस्ट वन थिंग' असं या शोचं नाव असणार आहे. या शोद्वारे प्रियांका जगभर फिरून अभिनेते, राजकीय नेते, आध्यात्मिक गुरू, लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्याशी भेटून बोलून जगात कसा बदल करता येईल यावर बोलणार आहेत.

प्रियांकाचा हा शो कधी सुरू होतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तिच्या नव्या शोमुळे प्रियांका नवी आणि अनोखी विचारधारा तिच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. खरं तर प्रियांकाने तिच्या सौंदर्याची आणि तिच्या अभिनयाची जादू हॉलिवूडपर्यंत पोहचवली आहे. त्यामुळे तिच्या या शोची उत्सुकता तिच्या विदेशी चाहत्यांनाही असणार हे नक्की.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2018 09:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading