प्रियांका चोप्रा जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात सुंदर स्त्री

प्रियांका चोप्रा जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात सुंदर स्त्री

एंजेलिना जोली, एमा वॉटसन, ब्लॅक लाइवली आणि मिशेल ओबामा यांसारख्या जगातील प्रसिद्ध हस्तींना मागे टाकत अभिनेत्री प्रियांका चोप्रा जगातील दुसऱ्या क्रमांकाची सुंदर महिला बनली आहे.

  • Share this:

05 एप्रिल :  एंजेलिना जोली, एमा वॉटसन, ब्लॅक लाइवली आणि मिशेल ओबामा यांसारख्या जगातील प्रसिद्ध हस्तींना मागे टाकत अभिनेत्री प्रियांका चोप्रा जगातील दुसऱ्या क्रमांकाची सुंदर महिला बनली आहे.

लॉस एन्जलिसच्या सोशल मीडिया नेटवर्क बजनेटनं एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात प्रियांकाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकाचा मान पॉप स्टार बेयॉन्सेनं मिळवलाय.

प्रियांका आता 34 वर्षाची आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल प्रियांकाने ट्विट केलाय. त्यात तिनं सगळ्यांचे आभार मानले आहेत. प्रियांका ट्विटमध्ये म्हणाली, 'बजनेटचे आणि मला तं देणाऱ्या सगळ्या लोकांचे धन्यवाद. बेयॉन्से ही माझ्यासाठीही पहिल्याच क्रमांकाची मानकरी आहे.'

निकालानुसार तिसऱ्या क्रमांकावर मॉडेल टेलर हिल, चौथ्या क्रमांकावर वाॅटसन, पाचव्या क्रमांकावर डकोटा जॉन्सन आणि सहाव्या क्रमांकावर हिलेरी क्लिंटन आहे.

एंजेलिना जोली ही आठव्या क्रमांकावर आहे, परंतु या वर्षीची ऑस्कर विजेता एमा स्टोन ही बाराव्या क्रमांकावर आहे. सुपरमॉडेल गिगी हदीद तेराव्या क्रमांकावर आहे.

प्रियांकाच्या बेवॉच चित्रपटातील तिची सह-कलाकार अॅलेक्सांड्रा डॅडारियोचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2017 09:45 AM IST

ताज्या बातम्या