प्रियांका चोप्राच्या सिगरेट ओढतानाच्या फोटोवर 'हे' आहे बहीण परिणीतीचं म्हणणं

प्रियांका चोप्राच्या सिगरेट ओढतानाच्या फोटोवर 'हे' आहे बहीण परिणीतीचं म्हणणं

प्रियांकाचा सिगरेट ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची चर्चा सुरू आहे. या मायामीच्या पार्टीला प्रियांकाची चुलत बहीण आणि अभिनेत्री परिणीती चोप्राही उपस्थित होती. तिचं याविषयी काय म्हणणं आहे पाहा...

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा सिगरेट ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सध्या सगळीकडे त्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर याविषयी उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियांकाने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा प्रियांकाचा priyanka chopra  हा पहिलाच वाढदिवस तिने अमेरिकेतच साजरा केला. प्रियांकाचा वाढदिवस खास असावा यात पती निक जोनसनं काहीही कसर सोडली नाही. पण शेवटी चर्चा झाली ती त्यांच्या मायामीच्या सेलिब्रेशनची. प्रियांका, निक आणि त्यांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी मायामीला क्रूझवर बर्थ डे पार्टी केली. त्या वेळचा प्रियांकाचा सिगरेट ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर सध्या सगळीकडेच त्याची चर्चा सुरू आहे.

या मायामीच्या पार्टीला प्रियांकाची चुलत बहीण आणि अभिनेत्री परिणीती चोप्राही parineeti chopra उपस्थित होती. तिने स्वतः प्रियांकाबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.  खरं तर सोशल मीडियावर ट्रोल होणं तिच्यासाठी नवीन नाही मात्र यावेळी सिगरेट ओढताना हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला टार्गेट केलं आहे.

हे वाचा - प्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनस आणि आई मधू चोप्रा यांच्या सोबत एका बोटमध्ये बसली असून यावेळी हे तिघंही सिगरेट ओठताना दिसत आहेत.

हेही वाचा शाहरुख खानसोबत 'हा' सीन शूट करताना मलायका अरोरा झाली होती रक्तबंबाळ

प्रियांका स्मोक करतानाचा फोटो व्हायरल झाला त्याविषयी काय वाटतं, असं विचारल्यावर इंडिया टुडेशी बोलताना परिणिती म्हणाली, "मला या विषयावर एवढंच म्हणायचंय की, मी या प्रश्नाचं उत्तर शकत नाही. या विषयी काही बोलण्याचा माझा अधिकार नाही."

 

View this post on Instagram

 

Miami done right! ⛵️Chill day on the boat laughing, dancing and making merry. Best way to celebrate a bday I’d say 💕

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

प्रियांकाचा सिगरेट ओढतानाचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मागच्या वर्षी दिवाळीच्या फटाक्यांच्या संदर्भातील तिच्या व्हिडिओची आठवण करुन देत युजर्स आता प्रियांकावर टीका करत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियांकानं तिला अस्थमा असल्याचा उल्लेख केला होता त्यामुळे आता सिगरेट ओढल्यावर तुला त्रास होत नाही का असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांकाला विचारला जात आहे.

हे पाहा सिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल

प्रियांकावर टीका करताना एका युजरनं लिहिलं, दिवाळी फटाके फोडल्यास प्रियांका अस्थमा असल्यास सांगते, मग पती आणि आईसोबत बसून सिगरेट ओढताना तिला अस्थमा आहे हे ती विसरली आहे का? तर दुसऱ्या एकानं तिला भारतीय संस्कृतीची आठवण करून देत आईसोबत बसून सिगरेट ओढायला तुला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला आहे. आणखी एका युजरनं लिहिलं, ही तिच प्रियांका चोप्रा आहे का? जी दरवर्षी दिवाळीला फटाक्यांच्या धुराचं ज्ञान देत असते.

आता एवढी टीका होत असूनही याविषयी काय वाटतं असं विचारल्यावर परिणीती चोप्रानं मात्र यावर काही बोलायचं टाळलं. नवा वाद उद्भवायला नको म्हणून तिनं काहीन न बोलणं पसंत केलं असावं.

-------------------------------------------------------

VIDEO: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर्स घटनास्थळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 02:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading