मुंबई 17 मार्च: अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबतच ती आपल्या रोकठोक उत्तरांमुळं देखील चर्चेत असते. नुकतंच प्रियांकाच्या एका चित्रपटाला ऑस्करसाठी (Oscar Awards) नामांकन मिळालं. यावरुन एका ऑस्ट्रेलियन पत्रकारानं तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रियांकानं देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तिच्या महत्वकांक्षी उत्तराची सर्वत्र स्तुती होत आहे.
जगप्रसिद्ध ऑस्कर पुरस्कारासाठीच्या (Oscar Awards) सर्व 23 विभागातील नामांकनांची (Nominations) यादी सोमवारी प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) यांनी घोषित केली. योगायोगानं प्रियांकाची निर्मिती आणि मध्यवर्ती भूमिका असलेल्या व्हाईट टायगर (White Tiger) या चित्रपटाचे दिग्दर्शक रामीन बहारानी (Ramin Bahrani) यांनाही बेस्ट अॅडॅप्टेड स्क्रीनप्ले (Best adapted Screenplay) विभागात नामांकन जाहीर झालं. त्यामुळं जगभरातून प्रियांका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, एका ऑस्ट्रेलियन पत्रकारानं (Australian Reporter) उपहासात्मक टिप्पणी करत त्यांच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर फोर्ड (Peter Ford) यानं प्रियांका आणि निक जोनास याचं चित्रपटात किती योगदान आहे? ऑस्करच्या नामांकनाची घोषणा करण्यासाठी ते पात्र आहेत असं मला वाटत नाही, असं ट्विट केलं होतं. त्यानं या दोघांचा फोटोही सोबत टाकला होता. फोर्ड याच्या ट्विटवर ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये हे तथाकथित प्रसिद्ध एन्टरटेनमेंट पत्रकार आहेत, असं वर्णन करण्यात आलं आहे.
अवश्य पाहा - पाहा अरुण जेठलींची ग्लॅमरस भाची; अल्ट बालाजीवर येतेय नवी वेब सीरिज
पीटर फोर्डच्या प्रश्नाला अतिशय माफक शब्दात प्रतिसाद देत प्रियांकानं चांगलेच सुनावले आहे. "कोणाची गुणवत्ता कशात असते याचं मोजमाप करण्याचे तुमचे विचार आवडले. माझ्या 60 पेक्षा अधिक चित्रपटांची यादी इथं देत आहे", असं म्हणत तिनं सोबत आपल्या 60 चित्रपटांची यादी जोडली आहे. तिच्या या उत्तराबद्दल चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
याआधी एका मुलाखतीत प्रियांकानं अशा टीका टिपण्ण्या झेलण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली होती. ती म्हणाली होती, मी इतरांसारखीच आहे. मलाही लोक माझ्याबद्दल काय म्हणतात हे ऐकायला, वाचायला आवडतं. सकाळी कॉफी घेत असताना किंवा कामावर जात असताना मी ट्विटर, इन्स्टाग्राम यावर माझ्याबद्दल आलेल्या गोष्टी, बातम्या वाचते. माझं नाव पॉप अप होतं तेव्हा मी मनात म्हणते, बघू तरी लोक काय म्हणत आहेत. मी लगेच त्यावर व्यक्त होत नाही किंवा माझ्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होऊ देत नाही.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.