मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Priyanka Chopra Daughter: 7 महिन्यानंतरही प्रियांकाची लेक दिसतेय फारच अशक्त; लेटेस्ट फोटोवरून होतेय चर्चा

Priyanka Chopra Daughter: 7 महिन्यानंतरही प्रियांकाची लेक दिसतेय फारच अशक्त; लेटेस्ट फोटोवरून होतेय चर्चा

प्रियांका चोप्राच्या लेकीचा म्हणजेच मालतीचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. या फोटोंवरुन मालतीच्या आरोग्यविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

प्रियांका चोप्राच्या लेकीचा म्हणजेच मालतीचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. या फोटोंवरुन मालतीच्या आरोग्यविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

प्रियांका चोप्राच्या लेकीचा म्हणजेच मालतीचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. या फोटोंवरुन मालतीच्या आरोग्यविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 08 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. लेक मालतीचा जन्म झाल्यापासून प्रियांका तिचे अनेक फोटो शेअर करत असते. प्रियांकाच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी तिचे चाहते अनेक दिवसांपासून आतूर आहेत. मालतीचे फोटो हा सोशल मीडियावर चर्चेत विषय बनला आहे. प्रियांकाने लेकीबरोबरचा कोणताही फोटो शेअर केला की तो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतो.  नुकताच प्रियांकानं निक आणि मालती बरोबर विकेंड एन्जॉय केला.  प्रियांकाची लेक आता सात महिन्यांची झाली आहे. तिच्या बरोबर पूलमध्ये मस्ती करतानाचे काही फोटो प्रियांकानं शेअर केलेत. या फोटोंनंतर मात्र सात महिन्यांनंतर प्रियांकाची लेक फारच अशक्त असल्याचं दिसत आहे. फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. प्रियांकानं हा विकेंड पती निक आणि लेक मालतीबरोबर घालवला. तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत ज्यात तिघेही पुलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. फोटोमध्ये तिघांनीही स्विमिंग सूट घातला आहे. त्याचप्रमाणे स्नॅक्स आणि ड्रिंक्सनं भरलेला टेबलही पाहायला मिळत आहे. हार्ट इमोजी पोस्ट करत प्रियांकानं तिचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेत. हेही वाचा - Alia Bhatt baby bump: आलियाचा बेबी बम्प लपता लपेना; क्युट कपलवर प्रेमाचा वर्षाव प्रियांका आणि निक जोनस जानेवारी महिन्यात आई बाबा झाले. आई बाबा झाल्यापासून हे कपल आपलं पॅरेंटहूड एन्जॉय करताना दिसत आहे. सरोगसी द्वारे आई बाबा झाल्यानंतर प्रियांकाची लेक मालती जवळपास 100 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. त्यानंतर दोघांनी मोठ्या उत्साहत लेकीला घरी आणलं. तेव्हापासून दोघेही लेकीबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. मालतीसाठी हा काळ फार अवघड होता. त्याचप्रमाणे प्रियांका आणि निकसाठीही हे दिवस फार कठीण होते. त्यामुळे दोघेही मालतीची विशेष काळजी घेतात. मात्र तिला इतर बाळांसारखं गुडगुडीत होण्यासाठी काही वेळ लागणार आहे.  त्यामुळेच ती सात महिन्यांची झाल्यानंतरही थोडी अशक्त वाटत असल्याचं म्हटलं जात आहे. प्रियांकाच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं झालं तर, प्रियांकाच्या 'सिटाडेल' या वेब सीरिजचं शुटींग नुकतचं पूर्ण झालं आहे.  लवकरच ही वेब सीरिज अमॅझोन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल. त्याचप्रमाणे प्रियांका 'एंडिंग शिंग्स' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या हॉलिवूड सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या बॉलिवूड सिनेमातही प्रियांका दिसणार आहे. या सिनेमात प्रियांका कतरिना आणि आलिया भट्ट यांच्याबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News

पुढील बातम्या