प्रियांकाच्या 'या' सिनेमातील एका सीनमुळे निकला कोसळलं रडू

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, 'माझ्या पतीसाठी घर खरेदी करणं आणि स्वतःचं बाळ असणं हे सध्या माझ्या लिस्टमध्ये टॉपला आहे.' असं प्रियांकानं सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 03:30 PM IST

प्रियांकाच्या 'या' सिनेमातील एका सीनमुळे निकला कोसळलं रडू

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच तिचा आगामी बॉलिवूड सिनेमा 'द स्काय इज पिंक'च्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी तिनं टोरांटो फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली. यावेळी तिनं पती निक जोनासबद्दल काही नव्या गोष्टींचा खुलासा केला.

यावेळी तिनं तिच्या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळीचा एक किस्सा शेअर केला. तिनं सांगितलं तिच्या सिनेमातील एक सीन पाहून निकला रडू कोसळलं होतं.

लग्नाच्या 4 दिवसआधी पर्यंत प्रियांका 'द स्काय इज पिंक'चं शूटिंग करत होती. यावेळी एक दिवस दिग्दर्शिका सोनाली बोसनं निकला पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. निक वेळेच्या अगोदरच प्रियांकाच्या शूटिंगच्या सेटवर पोहोचला.

प्रियांका त्यावेळी शूटमध्ये बीझी होती. हा सीन काळोखात शूट होत होता. निक शूटिंग पाहत होता आणि तो शूट होत असलेला सीन पाहून निकला रडू कोसळलं.

निक त्यावेळी अक्षरशः हुंदके देऊन रडला. याविषयी खरं तर प्रियांकाला काहीच माहित नव्हतं. पण हे घडलं त्यावेळी सोनाली निकच्या बाजूला उभी होती. तिनं हा किस्सा नंतर प्रियांकाला सांगितला.

Loading...

द स्काय इज पिंक हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे. त्यामुळे त्यात अनेक इमोशनल सीन्स आहेत. या सिनेमात प्रियांका आईच्या भूमिकेत दिसणार आहे. यात झायरा वसीम आणि फरहान अख्तर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानं तिच्या पर्सनल लाइफविषयी अनेक खुलासे केले. त्यात स्वतःच बाळ आणि पती निकसाठी घर घेणं या तिच्या टॉप प्रायॉरिटी असल्याचं तिनं सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...