'...और प्यार हो गया', प्रियांकानं सांगितलं निकच्या प्रेमात पडण्यामागचं कारण

'...और प्यार हो गया', प्रियांकानं सांगितलं निकच्या प्रेमात पडण्यामागचं कारण

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस सध्या बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधीलही लोकप्रिय कपल आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस सध्या बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधीलही लोकप्रिय कपल आहे. जवळपास 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकले. लवकरच हे दोघंही लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत आणि याची तयारी प्रियांकानं आतापासूनच सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं पती निक जोनसला एक कुत्र्याचं पिल्लू प्री वेडिंग अॅनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून भेट दिलं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानं तिची आणि निकची पहिली भेट कशी झाली आणि त्यानंतर ती निकच्या प्रेमात कधी पडली याविषयीचा खुलासा केला.

एका मुलाखतीत प्रियांका म्हणाली, 'निकशी लग्न करण्यामागे सर्वात चांगली गोष्ट ही होती की, त्याला माहीत आहे की, आमचं करिअर काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे. त्याचं करिअर माझ्या करिअरपेक्षा खूप मोठं आहे. त्याला या क्षेत्रात 21-22 वर्ष झाली आहेत. त्याला माहीत आहे की त्यानं आणि त्याच्या फॅमिलीनं त्याच्या करिअरसाठी किती त्याग केला आहे. ही गोष्ट होती ज्यामुळे मी निकच्या प्रेमात पडले.'

VIDEO : Bigg Boss च्या घरात बॉयफ्रेंडला विसरली हिमांशी, आसिमला केलं KISS

प्रियांका पुढे म्हणाली, 'मला आजही आठवतंय आमची दुसरी किंवा तिसरी डेट होती. त्याचवेळी मला लॉस एंजिलिसमध्ये एक मिटिंग होती. यावेळी माझ्या इंडिया आणि अमेरिका अशा दोन्ही टीम तिथं होत्या. आम्ही मित्रांसोबत लंच करत होतो. माझ्यासाठी हा माझ्या मित्रांसोबत घालवलेला अविस्मरणीय विकेंड होता. यावेळी जर मला निकनं ती मिटिंग रद्द करायला सांगितली असती तर मी नक्कीच केली असती.

सलमान अर्धवट सोडणार Bigg Boss 13, भाईजानला अचानक झालं तरी काय

निकनं मात्र तसं मुळीच केलं नाही. तो मला एका बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, मला माहीत आहे तू या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहेस. मी माझ्या मित्रांसोबत डिनरसाठी जात आहे तु तुझी मिटिंग संपवून परत ये त्यानंतर आपण भेटू. यानंतर मी मिटिंगसाठी निघून गेले. पण त्याचवेळी मला तो माझी किती काळजी करतो या गोष्टीची जाणीव झाली.'

रानू मंडल यांनी हिंदीनंतर गायलं थेट मल्याळम गाणं, VIDEO VIRAL

Published by: Megha Jethe
First published: November 29, 2019, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading