News18 Lokmat

प्रियांकाच्या पार्टीला रणवीर सिंगनं का फिरवली पाठ?

बाॅलिवूडचे सगळे सेलिब्रिटीज या पार्टीला आले होते. अगदी सितारे जमीं पर असा नजारा होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2018 09:17 AM IST

प्रियांकाच्या पार्टीला रणवीर सिंगनं का फिरवली पाठ?

मुंबई, 20 आॅगस्ट : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सचा साखरपुडा झाला. त्याचे फोटोजही सगळीकडे व्हायरल झालेत. आणि ती संध्याकाळ तर ग्रँड ठरली. इव्हिनिंग विथ प्रियांका असा नजारा  पाहायला मिळाला. बाॅलिवूडचे सगळे सेलिब्रिटीज या पार्टीला आले होते. अगदी सितारे जमीं पर असा नजारा होता.

परिणिती चोप्रा, सलमान खान, अर्पिता असे बरेच जण उपस्थित होते. पण दोन व्यक्तीच दिसत नव्हत्या. कोण होत्या त्या? बाॅलिवूडची हाॅट जोडी मीसिंग होती. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. म्हणजे आमंत्रण रणवीरला गेलं होतं. पण दीपिकापर्यंत निमंत्रण पोचलंच नव्हतं. आणि दीपिका नाही म्हणून रणवीर या पार्टीला गेला नाही.

आता प्रियांकानं दीपिकाला का बोलावलं नाही, हे मात्र कोडंच आहे अजून. कारण दीपिकानं नेहमीच प्रियांकाला पाठिंबा दिलाय. अगदी बाजीराव मस्तानी सिनेमातही दोघीही जवळच्या मैत्रिणीप्रमाणे राहिल्या होत्या. त्यांच्यात कधीच रुसवे फुगवे झाले नाहीत. त्यामुळेच सगळे जण आश्चर्य व्यक्त करतायत की प्रियांकाच्या पार्टीत दीपिकाला का बोलावलं नाही म्हणून. शिवाय दीपिका आणि रणवीरचं लग्न येत्या 20 नोव्हेंबरला आहे.

प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली होती.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

Loading...

VIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...