सहा बंगले आणि आठ लग्झरी गाड्या, प्रियांका चोप्रा आहे एवढ्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

सहा बंगले आणि आठ लग्झरी गाड्या, प्रियांका चोप्रा आहे एवढ्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

बॉलिवूडच्या देसी गर्लपासून ते जोनस कुटुंबातील सदस्य होण्यापर्यंतचा प्रियांकाचा प्रवास थक्क करणारा आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : बॉलिवूडच्या देसी गर्लपासून ते जोनस कुटुंबातील सदस्य होण्यापर्यंतचा प्रियांकाचा प्रवास थक्क करणारा आहे. जगभरात अनेक मुलींसाठी आज प्रियांका एक आयकॉन आहे. प्रियांका सध्या तिच्या करिअरसोबत संसारही एन्जॉय करत आहे. प्रियांका आणि निक जोनसचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 2000 मध्ये तिने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. यानंतर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने आणि अथक मेहनतीने तिने आपलं स्थान तयार केलं. बॉलिवूडनंतर तिने हॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली. प्रियांकाची एकूण संपत्ती 1 अब्ज 92 कोटी रुपये आहे. प्रियांकाकडे एकूण किती घर आणि गाड्या आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रियांकाचे मुंबईत अनेक घरं आहेत. वर्सोवात एका बिल्डिंगमध्ये प्रियांकाचे तीन मोठी घरं आहेत. तसेच न्यूयॉर्कमध्ये पेन्ट हाउस आहे. या पेन्ट हाउसची किंमत 30 कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबई आणि गोवात तिच्या नावाने जमीनही आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बागा बीचवरही तिचा एक बंगला आहे, ज्याची किंमत 20 कोटी रुपये आहे.

अक्षय कुमारसोबत होतं अफेअर, ब्रेकअपनंतर अभिनेत्रीनं बॉलिवूडला केलं गुडबाय

 

View this post on Instagram

 

Calm before the storm...coming at you #Day3 #TheSkyIsPink promotions... In theatres Oct 11! #TeamPixel

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

याशिवाय प्रियांकाला 2014 मध्ये यारी रोडवर एक बंगला विकत घ्यायचा होता. या बंगल्याचं नाव दरिया महल असं आहे. प्रियांका या बंगल्यासाठी 100 कोटी रुपये द्यायलाही तयार होती. मात्र काही कारणांमुळे ही डील होऊ शकली नाही. याशिवाय प्रियांका आणि निकने Beverley Hills वर एक घर विकत घेतलं. या घराची किंमत 44 कोटी रुपये आहे. डेटिंग अप बंबलमध्येही प्रियांकाची गुंतवणूक आहे. याशिवाय तिची स्वतःची पर्पल पेबल ही प्रोडक्शन कंपनीही आहे. फार कमी अभिनेत्रींकडे Rolls Royce Ghost ही कार असते. प्रियांकाकडे ही कार आहे. या कराची किंमत जवळपास 5 कोटी रुपये आहे.

किंग खानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या 'या' अभिनेत्री सध्या आहेत कुठे?

मुंबईच्या घरी प्रियांकाने ही कार ठेवली आहे. याशिवाय तिच्याकडे BMW 5 series, BMW 7 series, Audi Q7, Porsche Cayenne आणि दोन मर्सिडीज कार आहेत. नुकतीच प्रियांका आणि निकने Mercedes S 650 Maybach कार विकत घेतली. कारशिवाय प्रियांकाला बाइकचही वेड आहे. 2015 मध्ये प्रियांकाने गुलाबी रंगाची हार्ले डेविडसन बाइक विकत घेतली होती. व्हॅलेंटाइन डेला तिने ही बाइक स्वतःलाच गिफ्ट केली होती. प्रियांकाकडे सर्वात कमी किंमतीतले कपडेही 30 ते 50 हजार रुपयांच्या घरातले आहेत. प्रियांकाला महागड्या बॅग विकत घ्यायलाही आवडतात. प्रियांकाकडे Bottega Veneta, Tod's आणि Fendi या ब्रँडचे 4 लाख रुपयांच्या बॅग आहेत.

बॉलिवूडच्या 'या' 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

==================================================================

VIDEO : मंदीत 'संधी'? ठाण्यात चक्क सोन्याची मिठाई, किंमत...

Published by: Megha Jethe
First published: October 27, 2019, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading