प्रियांकाचा येतोय दुसरा मराठी चित्रपट, नाव आहे "काय रे रास्कला"

प्रियांकाचा येतोय दुसरा मराठी चित्रपट, नाव आहे

हेंटिलेटर या चित्रपटानंतर प्रियांका पुन्हा एकदा मराठी चित्रपट घेऊन येतेय.

  • Share this:

10 जून : व्हेंटिलेटर या चित्रपटानंतर प्रियांका पुन्हा एकदा मराठी चित्रपट घेऊन येतेय. "काय रे रास्कला" असं या चित्रपटाचं नाव असून याचं पोस्टर नुकतंच रिलीज केलंय.

प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊसचा हा दुसरा चित्रपट आहे. खुद्द प्रियांकाने आपल्या ट्विटर अकांउटवर या चित्रपटाचं पोस्टर तिच्या चाहत्यांसाठी शेअर केलंय.

पोस्टर रिलीज झालं असलं तरीही त्यामधून राजा आणि गुड्डु अशी ही दोन नावे समोर येताना दिसून येत असली तरी त्यांचे चेहरे अजुनही दाखवले नाही. हा चित्रपट 14 जुलै रोजी प्रेकक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रियांकाच्या व्हेंटिलेटर हा चित्रपट कॉमेडी होताच पण येणारा नवीन सिनेमासुद्धा कॉमेडीच असणार आहे. तसंच आई गिरीधरन स्वामी या पहिल्यांदाच दिग्दर्शन करताना दिसून येणार आहेत. एवढंच नव्हे तर प्रियांका हिंदी आणि भोजपुरी सिनेमांना प्रोड्युस तसंच को-प्रोड्युस करत आहे. प्रियांका एवढ्यावर थांबत नसून ती संजय लीला भन्साली बरोबर सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार ज्ञानपीठ सन्मानित अमृता प्रीतम हीच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

अमृता प्रीतम या एक पंजाबी साहित्यिक कवित्री आणि कादंबरीकार आहे. त्यांच्या लिखाणासाठी भारतात नव्हे तर पाकिस्तानात ही त्यांना सन्मानित केलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, अमृता प्रीतमच्या प्रिय गीतकारासाठी शाहरुख खान ही भूमिका साकारणार आहे. शेवटी दोन वर्षांच्या काळानंतर प्रियांका पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 08:23 PM IST

ताज्या बातम्या