S M L

प्रियांकाचा तिसरा मराठी सिनेमा 'फायरब्रँड'

फायरब्रँड असं या सिनेमाचं नाव असून अरूणा राजे या सिनेमाचं दिग्दर्शन करणारेत. या सिनेमात उषा जाधव, गिरिश कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jan 11, 2018 04:54 PM IST

प्रियांकाचा तिसरा मराठी सिनेमा 'फायरब्रँड'

11 जानेवारी : 'व्हेंटिलेटर' आणि 'काय रे रास्कला' या सिनेमांची यशस्वी निर्मिती केल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या तिसऱ्या मराठी सिनेमाची घोषणा केलीय. फायरब्रँड असं या सिनेमाचं नाव असून अरूणा राजे या सिनेमाचं दिग्दर्शन करणारेत. या सिनेमात उषा जाधव, गिरिश कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

प्रियांकाच्या व्हेंटिलेटर या सिनेमावर पुरस्कारांचा पाऊस पडला, पण काय रे रास्कला या सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता फायरब्रँड या सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बाॅलिवूडपेक्षा हाॅलिवूडमध्येच जास्त काम करणारी प्रियांका चोप्रा मराठी सिनेमाकडे वळते, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close