मुंबई, 15 मे : प्रियांका चोप्राच्या प्राॅडक्शनखाली बनलेल्या 'व्हेंटिलेटर' या सिनेमाला प्रचंड यश मिळाल्यानंतर आता ती पुन्हा मराठी सिनेमाच्या निर्मितीकडे वळलीय. आपल्या बॅनरखाली बनणाऱ्या चौथ्या मराठी सिनेमाची घोषणा तिने केलीय. 'पाणी' असं या सिनेमाचं नाव आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणारे. मराठवाड्यातील नगदरवाडी या दुष्काळग्रस्त खेड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातली कथा आपल्याला या सिनेमात पहायला मिळेल. आदिनाथ कोठारे, ऋचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम, गिरीष जोशी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi film, Pani, Priyanka chopra