• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • प्रियांका चोप्राचा पती निक जोनस 'या' गंभीर आजाराने आहे त्रस्त; 16 वर्षांपासून देतोय झुंज

प्रियांका चोप्राचा पती निक जोनस 'या' गंभीर आजाराने आहे त्रस्त; 16 वर्षांपासून देतोय झुंज

बॉलिवूड (Bollywood) आणि हॉलिवूड (Hollywood) अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकताच तिचा पती (Nick Jonas) आणि अमेरिकन गायक निक जोनसच्या (Nick Jonas Health) प्रकृतीबाबत आश्चर्यकारक खुलासा केला आहे. प्रियांका चोप्राने सांगितले की, निक जोनस गंभीर आजाराने ग्रस्त आहे.

 • Share this:
  मुंबई,  24 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)  आणि हॉलिवूड   (Hollywood)  अभिनेत्री प्रियांका चोप्राने   (Priyanka Chopra)  नुकताच तिचा पती   (Nick Jonas)  आणि अमेरिकन गायक निक जोनसच्या   (Nick Jonas Health)  प्रकृतीबाबत आश्चर्यकारक खुलासा केला आहे. प्रियांका चोप्राने सांगितले की, निक जोनस गंभीर आजाराने ग्रस्त आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा लहानपणापासूनच टाइप 1 मधुमेहाचा  (Type 1 Diabetes)   बळी ठरला आहे. गेल्या 16 वर्षांपासून तो या आजाराशी झुंज देत आहे. निक जोनस 13 वर्षांचा होता, जेव्हा त्याच्या कुटुंबाला कळले की त्याला मधुमेह आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Nick Jonas (@nickjonas)

  राष्ट्रीय मधुमेह महिन्याच्या निमित्ताने निक जोनसने स्वतःला मधुमेह झाल्याबद्दल खुलासा केला. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून याबद्दल खुलासा केला होता. त्याचवेळी प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत निकला मधुमेह आणि त्याचे गांभीर्य याबद्दल सांगितले होते.  लोकांमध्ये मधुमेहाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, निक जोनसने याबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला. आपले अनुभव शेअर करताना अमेरिकन गायकाने सांगितले की, सुरुवातीला तो खूप नाराज झाला होता. पण, हळूहळू तो सांभाळायला शिकला. आता तो उत्तआयुष्य जगत आहे. (हे वाचा:प्रियांका-निक घेणार घटस्फोट? आई मधू चोप्राची 'ती' कमेंट होतेय VIRAL) मीडिया रिपोर्ट्सनुसार, डायबिटीजमुळे निक एकावेळी कोमात गेला होता. निकच्या मते, पत्नी प्रियांका चोप्रामुळे तो आता यातून बऱ्याच अंशी सुटका करू शकला आहे. निकने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, त्याला मधुमेहाशी लढा देत  16 वर्षे झाली आहेत. तो 13 वर्षांचा होता जेव्हा त्याला त्याच्या भावांसोबत खेळताना काहीतरी बरोबर नसल्याचे जाणवले. जेव्हा त्याचे पालक त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा त्यांना कळले की मला टाइप 1 मधुमेह आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की , टाईप 1 मधुमेह ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्‍ये स्वादुपिंड कमी किंवा न च्या बरोबर इन्सुलिन तयार करते. कमी वयात याचा बळी जाणे हा एक प्रकारचा आनुवंशिक विकार आहे. ही एक जुनाट स्थिती आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात.
  Published by:Aiman Desai
  First published: