VIDEO : प्रियांका-निकचा सिंगापूर क्रूझवरचा व्हिडिओ व्हायरल

म्युझिक कॉन्सर्ट होईपर्यंत हे जोडपं सिंगापूरमध्ये थांबणार आहे. म्युझिक कॉन्सर्टच्या आधी क्रूझवरही या दोघांनी काही खास क्षण एकत्र घालवले.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2018 12:31 PM IST

VIDEO : प्रियांका-निकचा सिंगापूर क्रूझवरचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई, 06 आॅगस्ट : प्रियांका आणि निकच्या रिलेशनशिपबद्दल काय कळलं, पापाराझींना तर रान मोकळं झालं. दोघंही जिथे जातील तिथे ही मंडळी मागेच येत असतात. आणि मग ते दोघं काय करतायत, हात हातात घालून चालतायत का वगैरे इत्यंभूत बातमी समोर येते. आणि प्रियांकानं भारत सिनेमा सोडल्यानंतर तर या बातम्यांना उधाण आलंय. तेव्हा तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की आता प्रियांका चोप्रा कुठे आहे?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे जोडपं सध्या सिंगापूरमध्ये आहे. निक अमेरिकन सिंगर असल्याने त्याचे जगभरात चाहते आहेत. महिन्याभरापूर्वी म्युझिक कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केलेला नीक आता आणखी एका कॉन्सर्टसाठी सिंगापूरला पोहोचलाय. विशेष म्हणजे निकसोबत त्याची 'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रादेखील आहे. म्युझिक कॉन्सर्ट होईपर्यंत हे जोडपं सिंगापूरमध्ये थांबणार आहे. म्युझिक कॉन्सर्टच्या आधी क्रूझवरही या दोघांनी काही खास क्षण एकत्र घालवले. इन्स्टावर एक व्हिडिओही व्हायरल होतोय.

Loading...

@priyankachopra & @nickjonas at Singapore last night....🔥 . . #PriyankaChopra #nickjonas

A post shared by Priyanka Chopra Closet (@priyankacloset) on

खरं तर प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली होती.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...