मुंबई, 27 जुलै : काही दिवसांपासून चर्चेत असलेल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या जोडीने साखरपुडा केल्याचे कळतेय. 'पिपल'च्या वृत्तानुसार 18 जुलैला लंडनमध्ये प्रियांकाच्या वाढदिवसाला प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी साखरपुडा केला अशी माहिती मिळतेय.
भारत चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने एक ट्विट केलं आणि त्यानंतर ही चर्चा सुरू झालीय. प्रियांका आता 'भारत'चा भाग नसेल. त्याचं कारण खास आहे. तिने शेवटच्या क्षणी आपला निर्णय कळवला आहे. आम्ही तिच्यासाठी खूप आनंदी आहोत. भारत चित्रपटाच्या टीमकडून प्रियांकाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
विशेष म्हणजे अली यांनी निक ऑफ टाईम असा शब्दप्रयोग वापरल्याने या चर्चेला अजून उधाण आलंय. प्रियांका आता निकसोबत लग्न करतेय म्हटल्यावरही प्रियांकाचे चाहते खूश झालेत. नुकताच तिने काही दिवसांचा भारत दौरा केला होता. या दौऱ्यात तिच्यासोबत निकही दिसला. दोघंही गोव्यात काही दिवस सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. त्यामुळे लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता.
प्रियांकानं न्यूयाॅर्कला नवं घरही खरेदी केलंय. 30 कोटींचं हे घर 82मजली इमारतीत आहे. या आलिशान घराचीही चर्चा सुरू होती. प्रियांका निकसोबत त्याचा भाऊ आणि वहिनी यांनाही वेळ देते. त्यामुळे देसी गर्ल आता हाॅलिवूडची सूनबाई होणार यावर शिक्कामोर्तब झालं एकदाचं.
प्रियांकाचा साखरपुडा झाला, आता लग्न कधी हा प्रश्न चाहत्यांना पडलाय. निक तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.
खरं तर प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली.
यानंतर कधी बेसबॉलची मॅच पहायला तर कधी हॉलिवूडमधल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये डिनरला जाताना त्यांना स्पॉट करण्यात आलं. मात्र एवढ्यावरच निक आणि प्रियांकाचं नातं थांबलं नाही. निकने प्रियांकाची ओळख त्याच्या घरच्यांना करून दिली. आणि फॅमेली पिकनिकमध्येच प्रियांकाने निकच्या घरच्यांची मनं जिंकली. त्यानंतर ती निकच्या कझीनच्या लग्नासाठीही हजर राहिली.
खरं तर निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा