First Video : असं झालं प्रियांका- निकचं कॅथलिक वेडिंग

First Video : असं झालं प्रियांका- निकचं कॅथलिक वेडिंग

प्रियांका आणि निकनं लग्नानंतर जास्त रोमँटिक दिसायला लागलेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • Share this:

मुंबई, 4 डिसेंबर : प्रियांका आणि निकच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ आता एका खासगी मॅगझिनच्या माध्यमातून पुढे येत आहेत. प्रियांकाने आपल्या लग्नाच्या फोटोचे एक्स्क्लुझिव्ह राईट्स या मासिकाला विकले होते. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रियांकाचं लग्न कसं थाटात झालं हे तिच्या चाहत्यांना दिसतंय.

 

View this post on Instagram

 

@priyankachopra and @nickjonas’s stunning white wedding 😍. Venue: @umaidbhawanpalace Outfits: @ralphlauren #nickyanka #priyankachopra #nickjonas #priyankanick #bollywoodwedding #celebritywedding #celebs #hollywood #bollywoodnews #priyankachoprafans #hollywoodnews #trendingnews #bollywood #desigirl #peecee #weddingsutra

A post shared by WeddingSutra.com (@weddingsutra) on

असं म्हणतात प्रेम काही कितीही लपवा, ते लपत नाही. तुमच्या नजरेतून, अॅक्शनमधून ते समोर येतंच येतं. जसं सर्वसामान्यांचं, तसंच बाॅलिवूड सेलिब्रिटींचं असतं.

प्रियांका आणि निकनं लग्नानंतर जास्त रोमँटिक दिसायला लागलेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात प्रियांका-निकला फॅन्सनी घेरलंय. त्या गर्दीतही निक हळू आवाजात प्रियांकाला आय लव्ह यू म्हणतोय. व्हिडिओत ते स्पष्ट दिसतंय.

प्रियांका आणि निकच्या लग्नाचे सोहळे चांगलेच रंगलेत. आता दिल्लीला त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. त्यानंतर मुंबईत रिसेप्शन होईल. दोघंही अमेरिकेत ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. तिथे हाॅलिवूडचे सगळे दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

प्रियांका आणि निक यांचं लग्न २ डिसेंबरला कॅथलिक पद्धतीनं आणि ३ डिसेंबरला हिंदू पद्धतीनं झालं. त्यासाठी या दोघांच्या घरातले जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती.

दोन्ही प्रकारची लग्न लागल्यानंतर जंगी डिनर पार्टी झाली. त्यात केवढे तरी पदार्थ होते. आलेल्या पाहुण्यांना काय खाऊ, काय नको असं होऊन गेलं होतं.

सर्वसामान्यांच्या लग्नात पंचपक्वान्न असू शकतात. पण प्रियांका-निकच्या लग्नात एकूण होते 150 पदार्थ. काँन्टिनेंटलपासून देशी पदार्थापर्यंत सगळ्या प्रदेशातले पदार्थ होते. लग्न राजस्थानमध्ये झाल्यानं खास राजस्थानी पदार्थही होते.

प्रियांकाने आपल्या संगीत सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या सोहळ्यात प्रियांका सिल्व्हर अॅम्ब्रायडेड साडीत पाहण्यास मिळाली. तर निक जोनस हा ब्लू कुर्ता परिधान केलेला होता. संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे कुटुंबीय आणि इतर जवळचे सदस्य सहभागी झाले होते.

First published: December 4, 2018, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading