मुंबई, 25 नोव्हेंबर : दीपवीरनंतर प्रियांका आणि निकची लग्नघटिका जवळ यायला लागलीय. लग्न तर जोधपूरला होणार आहे. जोधपूरचा किल्ला या लग्नासाठी सजवला जातोय.
या लग्नात अगोदर कुणी फोटोग्राफर्सनी फोटोज काढू नयेत म्हणून एक चांगली शक्कल लढवलीय. लग्नात वधू-वर हेलिकाॅप्टरनं एन्ट्री करणार आहेत. त्यासाठी प्रियांका पहिल्यांदा मुंबईहून उदयपूरला जाणार. तिथून उम्मेद भवन पॅलेसमधून हेलिकाॅप्टरनं जोधपूरला लग्नाच्या ठिकाणी उतरणार.
29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत हेलिकाॅप्टर बुक केलं आहे. 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीनं तर 3 डिसेंबरला ख्रिशन पद्धतीनं लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी मधू चोप्रा आधीच जोधपूरला गेल्यात.
हिंदू आणि ख्रिश्चन रीतिरिवाजामध्ये हे दोघे लग्न करणार आहेत. यात संगीत, लग्न आणि रिसेप्शन असे तीन कार्यक्रम असणार आहेत. या शाही जोडप्याचा विवाह मेहरानगड किल्ल्यावर होणार आहे.
मेहरानगड हा महाल या दोघांच्या विवाहासाठी सजवण्यात येणार आहे. हा महालाची किंमत जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्का बसेल.
तब्बल 60 हजार डॉलर म्हणजेच 43 लाख रुपयांना हा महाल बुक करण्यात आला आहे. राजा उम्मैद सिंह यांचा बनवलेला हा महाल आहे. आता हा ताज हॉटेलच्या मालकीचा आहे.
एकत्र राहण्यासाठी मलायका आणि अर्जुनने केला कोट्यवधींचा खर्च
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा