Home /News /entertainment /

Priayanka Chopra-Nick Jonas आणखी एक गूड न्यूज देण्याच्या तयारीत, जवळच्या व्यक्तीचा खुलासा

Priayanka Chopra-Nick Jonas आणखी एक गूड न्यूज देण्याच्या तयारीत, जवळच्या व्यक्तीचा खुलासा

Priayanka Chopra-Nick Jonas

Priayanka Chopra-Nick Jonas

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, आता आणखी एक गूड न्यूज देण्याच्या तयारी दोघे असल्याचे वृत्त समोर आले आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 जानेवारी: बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सरोगसीच्या (Surrogacy) माध्यमातून ही अभिनेत्री आई झाली. दरम्यान, आता आणखी एक गूड न्यूज देण्याच्या तयारी दोघे असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका नव्या माहितीनुसार, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना त्यांच्या कुटुंबात दोन मुलं हवी आहेत. यूएस वीकलीशी बोलताना प्रियंका आणि निकच्या जवळच्या मित्राने यासंदर्भात खुलासा केला. प्रियांका आणि निक यांना "किमान दोन मुले" हवी आहेत. अशी माहिती जवळच्या मित्राने दिली. त्यामुळे दोघे लवकरच आपल्या चाहत्यांना पुन्हा गूड न्यूज देतील अशी चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे. निक जोनासचा भाऊ केविन जोनास याला आधीच दोन मुली आहेत. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी डिसेंबर 2018 मध्ये पारंपरिक भारतीय पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यानंतर तीन वर्षांनी ते आई वडील बनले आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे प्रियंकाने जाहीर केले. “आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केल असून आम्ही खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे अशा विशेष क्षणी आम्हाला खासगीपणा जपण्याची गरज आहे,” असे प्रियंकाने इन्स्टाग्रामद्वारे सांगितले.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Priyanka chopra

    पुढील बातम्या