बॉलिवूड गाण्यावर निक जोनासचा धम्माल डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

बॉलिवूड गाण्यावर निक जोनासचा धम्माल डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

निक जोनास यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्रानं अल्पवधीतच हॉलिवूडमध्येही आपले पाय घट्ट रोवलेत. निक जोनाससोबत अफेअर ते लग्न असो किंवा मग तिच्या सोशल मीडिया पोस्ट प्रियांका वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रिव्हिलिंग ड्रेसमुळे प्रियांकाला बरीच टीका सहन करावी लागली आणि तिच्या नावाची बरीच चर्चाही झाली. पण आता प्रियांका आणि तिचा नवरा निक जोनस नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.

प्रियांका आणि तिचा नवरा निक जोनास यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात निक जोनस आणि प्रियांका 'लडकी आँख मारे' या रणवीर सिंहच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. निकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर रणवीर सिंहनं फुल पॉवर अशी कमेंट सुद्धा केली आहे. निक जोनस हा हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आहे. पण तरीही त्याचं बॉलिवूड गाण्यांवर प्रचंड प्रेम आहे. अनेकदा तो प्रियांकासोबत बॉलिवूड गाण्यांवर थिरकताना दिसतो.

VIDEO : खासगीतले क्षण शूट करत होता करण जोहर; विकी कौशलने जोडले हात म्हणाला...

 

View this post on Instagram

 

Pre show dance party with my forever Valentine. @priyankachopra #valentines

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

निक आणि प्रियांका 2018 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. त्यावेळी त्यांच्या संगीत सेरेमनीला निकच्या संपूर्ण कुटुंबानं बॉलिवूड गाण्यांवर धम्माल ठेका धरला होता. त्यांचे त्यावेळीचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या दोघांचं लग्न होऊन आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे प्रियांका गुड न्यूज कधी देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. प्रियांकानं तिच्या मागच्या एका मुलाखतीत ती लवकरच बाळाचा विचार करणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेकदा तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या मात्र नंतर त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं.

मलायकाचा Black & White मधील हॉट अंदाज, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

 

View this post on Instagram

 

My Valentine. ♥️

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

आता लवकरच जोनास कुटुंबीयांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. प्रियांकाची जाऊबाई आणि जो जोनासची पत्नी सोफी टर्नर जोनास कुटुंबीयांना आनंदाची बातमी देणार आहे. सोफी आणि जो जोनासचं मागच्या वर्षी लग्न झालं होतं. रिपोटर्सनी दिलेल्या माहितीनुसार, सोफी टर्नर आणि जो जोनास आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. परदेशी मीडियाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षांची सोफी टर्नर प्रेग्नन्ट आहे. मात्र या कपलने ही आनंदाची बातमी केवळ कुटुंबातील सदस्यांना आणि मित्र परिवाराला दिली आहे.

Video Viral झाल्यानंतर नेहाशी लग्न करण्याबाबत आदित्य नारायणचा धक्कादायक खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 06:00 PM IST

ताज्या बातम्या