VIDEO अखेर झालं हिरव्या साडीतल्या चि. सौ. कां. प्रियांकाचं दर्शन

VIDEO अखेर झालं हिरव्या साडीतल्या चि. सौ. कां. प्रियांकाचं दर्शन

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं लग्न राजस्थानात जोधपूरच्या पॅलेसमध्ये राजेशाही थाटामाटात पार पडलं. नवपरिणित जोडप्यानं जोधपूरमधून निघताना चाहत्यांना, मीडियाला कसे सामोरे गेले पाहा..

  • Share this:

जोधपूर, ३ डिसेंबर : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं लग्न राजस्थानात जोधपूरच्या पॅलेसमध्ये राजेशाही थाटामाटात पार पडलं. नवपरिणित जोडप्याचे जोधपूरहून निघतानाचे फोटो मीडियाच्या हाती लागले आहेत. प्रियांका आणि निक २ दिवसाचा लग्नसोहळा आटपून जोधपूर सोडायला तयार झालेत. त्या वेळचा हा व्हिडिओ.
प्रियांका आणि निक यांचं लग्न २ डिसेंबरला कॅथलिक पद्धतीनं आणि ३ डिसेंबरला हिंदू पद्धतीनं झालं. त्यासाठी या दोघांच्या घरातले जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती.


दोन्ही प्रकारची लग्न लागल्यानंतर जंगी डिनर पार्टी झाली. त्यात केवढे तरी पदार्थ होते. आलेल्या पाहुण्यांना काय खाऊ, काय नको असं होऊन गेलं होतं.


सर्वसामान्यांच्या लग्नात पंचपक्वान्न असू शकतात. पण प्रियांका-निकच्या लग्नात एकूण होते 150 पदार्थ. काँन्टिनेंटलपासून देशी पदार्थापर्यंत सगळ्या प्रदेशातले पदार्थ होते. लग्न राजस्थानमध्ये झाल्यानं खास राजस्थानी पदार्थही होते.


प्रियांकाने आपल्या संगीत सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या सोहळ्यात प्रियांका सिल्व्हर अॅम्ब्रायडेड साडीत पाहण्यास मिळाली. तर निक जोनस हा ब्लू कुर्ता परिधान केलेला होता. संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे कुटुंबीय आणि इतर जवळचे सदस्य सहभागी झाले होते.
प्रियांका चोप्राने यावेळी एका डान्स परफाॅर्मन्समध्ये आपली आई मधू चोप्रासोबत थिरकली. हा संगीत सोहळा असा पार पडला की जणून एका बाॅलिवूड पुरस्काराचा सोहळा होता. या संगीत सोहळ्यात प्रियांकासोबत तिची बहिण परिणीती चोप्राही पाहण्यास मिळाली. तसंच इतर पाहुणेही यात सहभागी झाले होते.


सोशल मीडियावर प्रियांकाच्या संगीत सोहळ्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहे. निकनेही यावेळी शानदार परफाॅर्मन्स दिलं. एवढंच नाहीतर या संगीत सोहळ्याचा जेव्हा ग्रुप फोटो काढण्यात आला तेव्हा विजेत्या टीमला एक चषकही देण्यात आले.

देसीगर्ल प्रियांकाच्या संगीत सोहळ्याचे धम्माल फोटोज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 03:30 PM IST

ताज्या बातम्या