मुंबई, 1 डिसेंबर- बॉलिवूडमध्ये (Bollywood Wedding Season) सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक नवीन कपल लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर काही जुने कपल आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. दीपिका-रणवीरनंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनससोबत (Nick Jonas) आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. निक आणि प्रियंकाच्या लग्नाला आज ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांनी हा खास दिवस आणखीनच खास बनवला आहे.
View this post on Instagram
प्रियांका चोप्राचा पती अर्थातच हॉलिवूड अभिनेता आणि गायक निक जोनसने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच खास आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका आणि निक आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहेत. व्हिडीओमध्ये संपूर्ण रूम कँडल्सनी सजवलेली आहे. काचेच्या मगपत्रात त्या कँडल्स खूपच सुंदर वाटत आहेत. शिवाय भोवतीने काही संदेश लिहिण्यात आले आहेत. आणि मध्यभागी फुलांनी आणि कँडल्सनी एक टेबल सजवण्यात आला आहे. त्याजवळच प्रियांका बसली आहे. प्रियांका सुंदर अशी पोज देताना दिसून येत आहे. अभिनेत्री फारच आनंदात दिसत आहे.
View this post on Instagram
प्रियांका आणि निक हे सर्वात चर्चित कपलमधील एक आहे. या दोघांचं बॉन्डिंग चाहत्यांना फारच आवडत. दोघेही सतत एकेमकांसोबत वेळ घालवताना आणि एकमेकांसाठी काहीतरी खास करताना दिसून येतात. दोघेही अतिशय स्टायलिश आहेत. या दोघांना अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनोख्या स्टाईलमध्ये पाहण्यात आलं आहे. प्रियांका आणि निकमध्ये वायाच फार मोठं अंतर आहे. निक हा पत्नी प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. त्यामुळे या दोघांना अनेकवेळा ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र या दोघांचं प्रेम पाहून सर्वांचीच बोलती बंद होते. नुकताच प्रियांकाने जोनस ब्रदर्सच्या रोस्ट शोमध्ये यावर मजेशीर स्पष्टीकरण दिलं होतं. यावेळी अभिनेत्रीने म्हटलं कि, आमच्यात वयाचा अंतर आहे. याचा पण आम्हाला फायदाच आहे. कारण आम्ही एकमेकांना अनेक गोष्टी शिकवत असतो. जसे कि निकने मला टिकटॉक शिकवलं. तर मी त्याला यशस्वी करिअर कसं असतं? हे दाखवून दिलं.
काही दिवसांपूर्वी प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निकचं आडनाव जोनस हटवलं होतं. त्यामुळे सर्वच लोक गोंधळात पडले होते. सोशल मीडियावर तर या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र या दोघीनींही आपलं प्रेम व्यक्त करत या गोष्टींवर पूर्णविराम लावला होता. प्रियांका आणि निकने २०१८ मध्ये राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग केलं होतं. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्च्नन पद्धतीने विवाह केला होता. आज हे दोघे आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Nick jonas, Priyanka chopra