News18 Lokmat

ज्योतिषानं केली भविष्यवाणी, निकला राहावं लागणार सावध

बाॅलिवूडचे ज्योतिषी संजय जुमानी यांनी दोघांचं भविष्य वर्तवलंय. त्यांनी महत्त्वाच्या 5 गोष्टी सांगितल्या.

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 12:14 PM IST

ज्योतिषानं केली भविष्यवाणी, निकला राहावं लागणार सावध

मुंबई, 6 डिसेंबर : प्रियांका-निक यांचं लग्न धुमधडाक्यात झालं. लग्नाप्रमाणे रिसेप्शनही गाजलं. दिल्लीच्या रिसेप्शनला पंतप्रधान आले होते. आता दोघांचा संसार सुरू होतोय. बाॅलिवूडचे ज्योतिषी संजय जुमानी यांनी दोघांचं भविष्य वर्तवलंय. त्यांनी महत्त्वाच्या 5 गोष्टी सांगितल्या.


1. संजय जुमानी म्हणालेत, निक जोनसला प्रियांकाच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल सावध राहावं लागेल. प्रियांका डाॅमिनेटिंग आणि प्रामाणिक आहे.


2. प्रियांका आणि निकची रास जल आणि भूतत्त्वाची आहे. त्यामुळे दोघं एकमेकांसाठीच बनलेत.

Loading...


3. प्रियांका आणि निकच्या स्वभावात बदल होई शकतो. त्यांनी योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन करून स्वत:ला शांत ठेवावं.


4. प्रियांकाचा 9 आकडा लकी आहे. ती इतरांच्या वरचढ होईल.


5. 9 संख्या असलेले धैर्यशाली असतात. लीडर होतात. प्रियांका वयाच्या 45व्या वर्षी राजकारणात प्रवेश करेल.


36 वर्षांची प्रियांका आणि 26 वर्षांचा निक जोनास यांचा विवाह 2 डिसेंबरला झाला. त्यानंतर दिल्लीतल्या रिसेप्शनला पहिल्यांदाच प्रियांका मीडियाशी बोलली.


'मी किती खुश आहे असं कुणी विचारलं आणि १ ते १० असा हॅपिनेस इंडेक्स असेल तर मी १२ नंबर देईन', असं प्रियांका म्हणाली. मी सुखाच्या परमोच्च क्षणावर आहे, असं सांगताना या लग्नसोहळ्याच्या दगदगीनं अजिबात थकलेली नसल्याचंही सांगितलं.


३ दिवसांचा लग्नसोहळा, दिल्लीत रिसेप्शन, मुंबईतली पार्टी आणि अखेर अमेरिकेतलं जंगी रिसेप्शन असा या जोडीचा वेडिंग प्लॅन आहे. निक जोनास त्याच्या कुटुंबीयांसह आणि मित्रमंडळींसह भारतीय लग्नसोहळा एंजॉय करताना दिसतोय.


एखाद्या परिकथेप्रमाणं वाटतंय हे सुख... असं प्रियांकानं आपल्या इन्स्टापोस्टमध्ये लिहिलं होतं. भारतीय लग्न मला मनापासून आवडल्याचं निकनंही भारतीय मीडियाशी बोलताना सांगितलं.मलायकाच्या नव्या बुटांचा फोटो व्हायरल, किंमत ऐकलीत तर व्हाल थक्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...