S M L

प्रियांका चोप्राच्या लग्नात सामील होणार 'ही' शाही जोडी

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हाॅलिवूड गायक निक जोन्सच्या साखरपुड्याचे रितीरिवाज संपन्न झाले. त्यांनी त्यांच्या नात्यावर आॅफिशियल मोहोर उमटवली.

Updated On: Aug 23, 2018 02:29 PM IST

प्रियांका चोप्राच्या लग्नात सामील होणार 'ही' शाही जोडी

मुंबई, 23 आॅगस्ट : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हाॅलिवूड गायक निक जोन्सच्या साखरपुड्याचे रितीरिवाज संपन्न झाले. त्यांनी त्यांच्या नात्यावर आॅफिशियल मोहोर उमटवली. प्रियांकाच्या कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींकडून कळलेल्या माहितीनुसार लग्नाची तयारी सुरू झालीय. निकची इच्छा आहे, हे लग्न लवकरात लवकर व्हावं. मध्यंतरी त्यानं दिलेल्या मुलाखतीत त्याला लहान मुलं आवडतात असं म्हटलं होतं. कदाचित हा इशारा प्रियांकाकडे असू शकतो. असो. प्रियांकानं लग्नाच्या याद्या बनवायला सुरुवात केलीय.

असं म्हणतायत, प्रियांकाच्या लग्नात तिचे खास मित्र मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी सामील होतील. प्रियांका आणि मेगन मार्कलची मैत्री सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे हे दोघं लग्नाला नक्की येतील. शिवाय ब्रिटिश राॅयल जोडीनं मित्रमैत्रिणीच्या लग्नाला जायचं नाही, असा काही प्रोटोकाॅल नाहीय.

त्याबरोबर हाॅलिवूडचे इतर स्टार्सही लग्नाला उपस्थितीत असतील. पहिल्यांदाच बाॅलिवूडच्या लग्नात हाॅलिवूडची हजेरी पाहायला मिळणार आहे. बाॅलिवूड-हाॅलिवूडचा हा जलवा नक्कीच अनोखा असेल एवढं नक्की.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 02:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close