अखेर प्रियांकाच्या लग्नाबद्दल बोलली तिची आई

अखेर प्रियांकाच्या लग्नाबद्दल बोलली तिची आई

यावर्षी प्रियांका तिचा वाढदिवस अमेरिकेतच निकसोबत साजरा करणार आहे

  • Share this:

मुंबई, 17 जुलैः सध्या बॉलिवूडची देसी गर्ल तिच्या सिनेमांपेक्षा खासगी कारणांमुळे चर्चेत आहे. प्रियांका अमेरिकन गायक निक जोंसला डेट करत आहे. नुकताच तिने काही दिवसांचा भारत दौरा केला. या दौऱ्यात तिच्यासोबत निकही दिसला. दोघंही गोव्यात काही दिवस सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. त्यामुळे लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

आतापर्यंत प्रियांकाने तिच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. पण एका पत्रकार परिषदेत प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना मुलीच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांना सुरूवातीला प्रसारमाध्यमांच्या या प्रश्नाचा राग आला. मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवत, तुम्ही असे प्रश्न का विचारता... कार्यक्रमाशी निगडीत प्रश्न विचारा आणि इतर प्रश्न विचारण्यासाठी माझ्या क्लिनीकमध्ये या असे त्या म्हणाल्या.

भलेही प्रियांकाच्या आईने तिच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळले असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका तिच्या या नात्याचा फार गांभीर्याने विचार करत आहे. आतापर्यंत प्रियांका तिचा वाढदिवस भारतात मित्र- परिवाराच्या उपस्थितीत साजरा करते. पण हे वर्ष तिच्यासाठी थोडं वेगळं आहे. यावर्षी प्रियांका तिचा वाढदिवस अमेरिकेतच निकसोबत साजरा करणार आहे.

हेही वाचाः

एसीबीची सगळ्यात मोठी कारवाई, भारतीय बटालियन कार्यालयात लाच घेताना 6 जणांना अटक

कहर! फोन काढण्यासाठी टॉयलेटच्या भांड्यात घातला हात, 5 तासांसाठी अडकला

गोरक्षेच्या नावाने हिंसा करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

VIDEO : खड्ड्यांसाठी मुंबईकरांना मिळतेय 'तारीख पे तारीख'

VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 04:03 PM IST

ताज्या बातम्या