रिव्हिलिंग ड्रेसमुळे प्रियांका झाली ट्रोल, आई मधू चोप्रां टीकाकारांना म्हटलं...

रिव्हिलिंग ड्रेसमुळे प्रियांका झाली ट्रोल, आई मधू चोप्रां टीकाकारांना म्हटलं...

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागच्या काही दिवसांपासून ग्रॅमी अवॉर्डमध्ये घातलेल्या रिव्हिलिंग ड्रेसमुळे चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागच्या काही दिवसांपासून ग्रॅमी अवॉर्डमध्ये घातलेल्या ड्रेसमुळे चर्चेत आहे. या अवॉर्ड सोहळ्यातील प्रियांकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या ड्रेसमुळे तिला खूप ट्रोल व्हावं लागलं. पण आता प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना याविषयी विचारण्यात आलं असता त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

प्रियांका चोप्रानं ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात डीप नेक गाऊन परिधान केला होता. पण या ड्रेसची नेकलाइन बेंबी पर्यंत डीप होती. ज्यामुळे बॉलिवूडच्या देसी गर्लला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. परदेशात जाऊन प्रियांका देशातले संस्कार विसरली अशी टीका तिच्यावर केली जात होती. पण आता तिची आई मधू चोप्रा यांनी मात्र आपल्या मुलीचं समर्थन करत तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रियांकावर टीका करणाऱ्यांनी मधू चोप्रा यांनी अनोळखी म्हटलं आहे.

दिव्यांकाची ओढणी बिग बींनी पकडली... पाहा VIDEO

प्रसारमाध्यमांशी बोलताना मधू चोप्रा म्हणाल्या, प्रियांकाला ट्रोल करणारे अनोळखी लोक आहेत जे आपल्या कम्प्युटर्स किंवा तत्सम गोष्टींमागे लपलेले आहेत. प्रियांका तिच्या अटींवर जगते. ती कोणालाही नुकसान पोहोचवत नाही आहे. हे तिचं शरीर आहे आणि तिच्या एक सुंदर शरीर आहे.

ट्रोलर्सवर निशाणा साधत मधू चोप्रा म्हणाल्या, ट्रोल करणारे स्वतःच्या आयुष्यात आनंदी नाहीत त्यामुळेच ते अशाप्रकारे घाणेरड्या गोष्टी करुन दुसऱ्यांवर अशा वाईट कमेंट करुन स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी अशा लोकांवर लक्ष कधीच देत नाही. हा ड्रेस घालण्याआधी प्रियांकानं मला त्याचं सॅम्पल दाखवलं होतं आणि मला माहित होतं की हा ड्रेस घालणं तिच्यासाठी रिस्की असू शकतं. पण हा काही सुंदर ड्रेसपैकी एक ड्रेस होता.

PHOTOS : नेहा-आदित्यची बॅचलर पार्टी, इंडियन आयडलच्या सेटवर लगीनघाई

 

View this post on Instagram

 

So proud of this fam. Congratulations @jonasbrothers you guys crushed it today. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्सने प्रियांकाच्या ड्रेसच्या नेकलाइनच्या लांबीवरुन तिची खिल्ली उडवत त्याला, ‘लॉस एंजेलिस ते क्यूबा’ असं म्हटलं होतं. त्याच्या या कमेंटनंतर युजर्सनी रॉड्रिक्सलाही ट्रोल केलं होतं. काही लोकांनी रॉडिक्सनं प्रियांकाला बॉडी शोमिंगसाठी ट्रोल केल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर त्यानं मी तिच्या ड्रेस बद्दल बोललो बॉडीबद्दल नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं.

पाहा VIDEO : Love Aaj Kal मधील गाण्याची कॉपी उघड? iPhone कनेक्शन आलं समोर

प्रियांकानं निकसोबत ग्रॅमी 2020च्या रेड कार्पेटवर फॅशन डिझायनर राल्फ अँड रुशोच्या डिझायनर ड्रेसमध्ये एंट्री केली होती. या इव्हरी व्हाइट गाऊनची हायलाइट होती त्याची लॉन्ग नेकलाइन. ही नेकलाइन खूपच रिव्हिलिंग होती. ज्यामुळे प्रियांका सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली. या ड्रेसमधील फोटो प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर हा ड्रेस आतापर्यंत तिचा सर्वात वाईट ड्रेस असल्याचं म्हटलं होतं.

First published: February 1, 2020, 10:16 AM IST

ताज्या बातम्या