प्रियांकाच्या लग्नाला 'हा' खास ड्रेस डिझायनर तयार करतोय वधूवराचा पोशाख

प्रियांकाच्या लग्नाला 'हा' खास ड्रेस डिझायनर तयार करतोय वधूवराचा पोशाख

2 डिसेंबरला प्रियांकाचं लग्न आहे आणि तिची तयारी सुरू झालीय.

  • Share this:

मुंबई, 22 आॅक्टोबर : दीपिका-रणवीरच्या लग्नाची बातमी येऊन धडकली. त्याआधी प्रियांका चोप्रा आणि निकच्या लग्नाची तारीखही कळली. दोन्ही लग्न लागोपाठ होणार आहेत. 2 डिसेंबरला प्रियांकाचं लग्न आहे आणि तिची तयारी सुरू झालीय.

आधी संदीप खोसला आणि अबू जानी प्रियांकासाठी ड्रेस डिझाईन करणार अशी बातमी होती. आता त्यात सब्यासाचीचंही नाव जोडलं गेलंय. स्पाॅटबाॅयच्या माहितीनुसार संदीप आणि अबू जानी लग्नाच्या संगीताचा लेहंगा डिझाइन करणार आहेत, तर सब्यासाची लग्नाचा लेहंगा डिझाइन करेल. प्रियांका अमेरिकेला जाण्याआधी सब्यासाचीला भेटली होती.

हा लग्नसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.जोधपूर इथं दोघांनीही जाऊन हे लग्नस्थळ निश्चित केलंय. लग्नाला फक्त 200 जण उपस्थित असतील. अगदी जवळचे मित्र,मैत्रिणी,नातलग या लग्नाचे साक्षीदार होतील.

18 ऑगस्टला या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला होता. निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.

प्रियांका आता बनलीय गुंतवणूकदार. तिनं अमेरिकेच्या दोन टेक्नाॅलाॅजीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलीय. परदेशी वर्तमानपत्रातला मजकूर इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत ती म्हणते, ' माझ्यासाठी हा नवा चॅप्टर आहे. टेक स्पेसच्या दोन कंपनीज सोबत मी गुंतवणूकदार म्हणून जोडली गेलीय. मला हा माझा मोठा सन्मान वाटतोय.'

प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का?

First published: October 22, 2018, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading