Home /News /entertainment /

आई बनताच Priyanka Chopra चा मोठा निर्णय! 'Jee Le Zara' मध्ये काम करण्यास दिला नकार

आई बनताच Priyanka Chopra चा मोठा निर्णय! 'Jee Le Zara' मध्ये काम करण्यास दिला नकार

नुकताच प्रियांका आणि निक सरोगेसीद्वारे आईबाबा (Priyanka Nick Baby) बनले आहेत.

    मुंबई, 25 जानेवारी- अभिनेत्री प्रियांका चोप्रा   (Priyanka Chopra)  बॉलिवूडनंतर   (Bollywood)  आता हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवत आहे.नुकताच प्रियांका आणि निक सरोगेसीद्वारे आईबाबा  (Priyanka Nick Baby)  बनले आहेत. प्रियांकाने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली होती. त्यांनतर आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं सांगितलं जात आहे की लेकीच्या आगमनानंतर प्रियांका चोप्राने 'जी ले जरा'   (Jee Le zaraa)   चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. ती आपला पूर्ण वेळ आपल्या लेकीला देऊ इच्छित असल्याचं म्हटलं जात आहे. अनेक वर्षांपासून प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये झळकलेली नाही. ती सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. चाहते तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. परंतु चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १०० कोटींमध्ये तयार होत असलेल्या 'जी ले जरा' चित्रपटात काम करण्यासाठी प्रियांका चोप्राने नकार दिला आहे. याबद्दल अभिनेत्रीने चित्रपटाचे दिग्दर्शक रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरसोबत संवाद साधला आहे. सोबतच तिने या चित्रपटात आपल्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध घेण्याचा सल्लाही दिला आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस काही दिवसांपूर्वी एका लेकीची आईबाबा बनले आहेत. या दोघांनी सरोगेसीद्वारे आपल्या बाळाला जन्म दिला आहे.दक्षिण कॅलिफोर्नियाच्या एका हॉस्पिटलमध्ये या बाळाचा जन्म झाला आहे. परंतु डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या १२ आठवडे आधीच प्रियांकाची लेक जन्माला आली आहे. त्यामुळे ती थोडी अशक्त आहे. प्री मॅच्युअर असल्यामुळे तिला आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आलं आहे. (हे वाचा: या' कलाकारांनी नाकारला होता 'Pushpa', नंतर Allu Arjun ने घातला धुमाकूळ) या सर्व परिस्थिती दरम्यान प्रियांका चोप्रा रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या या चित्रपटातून बाहेर होऊ शकते. या चित्रपटात प्रियांकासोबतच कतरिना कैफ आणि आलिया भट्टसुद्धा आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते उत्सुक झाले आहेत. या तिन्ही दमदार अभिनेत्रींना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. हा चित्रपट एक रोड ट्रिपवर आधारित असणार आहे. परंतु आता प्रियांका चोप्रा आपला संपूर्ण वेळ आपल्या नवजात लेकीला देऊ इच्छित आहे. त्यामुळे तिला या चित्रपटासाठी वेळ देणं कठीण झालं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Priyanka chopra

    पुढील बातम्या