मुंबई, 1 नोव्हेंबर : प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे कायम चर्चेत असते. आता प्रियांका चोप्रा तब्बल 3 वर्षांनी भारतात परतली आहे. तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत याविषयी अपडेट दिली आहे. याशिवाय सध्या तिचे मुंबई विमानतळाबाहेरील अनेक व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने काल तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अमेरिकेतून भारतात येण्याविषयी सांगितलं होत. आता आज भारतात येताच तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रियांका पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रासोबत अमेरिकेत राहते. सध्या प्रियांका एकटीच भारतात आली आहे.
प्रियंका चोप्रा आज पहाटे मुंबई विमानतळावर पोहोचली आहे. प्रियांकाचे विमानतळावर आगमन होताच पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. प्रियांकानेही पापाराझींना शुभेच्छा दिल्या. प्रियांकाने तिच्या एअरपोर्ट लुकसाठी कम्फर्ट ब्लू आउटफिट कॅरी केला होता. प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या लँडिंगचा फोटो शेअर केला आणि त्यात तिने 'अखेर परतले…' असं म्हटलं आहे. त्यानंतर विमानतळावरुन ती घरी जात असताचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत मुंबईतील रस्ते पाहायला मिळत आहे. त्यावर ‘मुंबई मेरी जान’ असे म्हटले आहे.
हेही वाचा - करीना-सैफमध्ये 'दुरावा'; जेह आणि तैमूरलाही एकमेकांपासून दूर केलं कारण...
यानंतर प्रियांकाने तिच्या कॅबमधून मुंबईच्या रस्त्यांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये बांद्रा, मंत्रालय, अंधेरी आणि इतर ठिकाणांची नावे दिसत आहेत. त्यावर ‘मुंबई मेरी जान’ असे म्हटले आहे. प्रियांका तिच्या मुंबईतील घरी पोहोचताच तिने एक फोटो शेअर केला आहे. यात ती आराम घेताना दिसत आहे. यावेळी ती समोर टीव्हीवर कॉफी विथ करण हा शो पाहताना दिसत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “जर तुम्ही टीव्हीवर करण जोहरचा शो पाहिला नसेल तर तोपर्यंत तुम्ही मुंबईत नाहीत.” असे ती म्हणाली आहे. याबरोबर तिने तिच्या आवडत्या वेफर्सचे फोटोही शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्रा शेवटची भारतात 2019 मध्ये आली होती. या वर्षी तिचा 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसली होती. या चित्रपटात जायरा वसीमही होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आणि प्रमोशननंतर प्रियांका पुन्हा लॉस एंजेलिसला परतली.
दरम्यान प्रियांकाने सरोगसीद्वारे एका मुलीलाही जन्म दिला. आता बऱ्याच काळानंतर ती पुन्हा भारतात परतलेली दिसत आहे. तीच पुन्हा परत येण्याचं कारण अजून समोर आलं नसलं तरी तिच्या येण्याने भारतीय चाहते मात्र चांगलेच खुश झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.