मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

देसी गर्लसाठीही आव्हानात्मक ठरल्या बॉलिवूड फिल्म्स; 3 भूमिका साकारणं सर्वात कठीण

देसी गर्लसाठीही आव्हानात्मक ठरल्या बॉलिवूड फिल्म्स; 3 भूमिका साकारणं सर्वात कठीण

17 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra Jonas) मनात बॉलिवूडमधील 3 फिल्म्स (bollywood film) एक वेगळंच स्थान आहे.

17 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra Jonas) मनात बॉलिवूडमधील 3 फिल्म्स (bollywood film) एक वेगळंच स्थान आहे.

17 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra Jonas) मनात बॉलिवूडमधील 3 फिल्म्स (bollywood film) एक वेगळंच स्थान आहे.

    मुंबई, 30 डिसेंबर : अभिनेत्री प्रियंका चोप्राला देसी गर्ल म्हणून ओळखलं जातं. पण या देसी गर्लसाठी बॉलिवूड फिल्म्समध्ये (bollywood film) काम करणं सर्वात आव्हानात्मक ठरलं. विशेषत: 3 चित्रपट ती कधीच विसरू शकत नाही. आपल्या 17 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत अभिनेत्री आणि निर्माती प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas) हिनं बर्फी (Burfee) , सात खून माफ (Saat Khoon Maaf) आणि बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) या चित्रपटामधील आपल्या भूमिकांना विशेष स्थान असल्याचं म्हटलं आहे. माजी मिस वर्ल्ड (Former Miss World )ठरलेल्या प्रियांका चोप्रानं 2003 मध्ये ‘दी हिरो: लव्हस्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण या तीन फिल्म्स ती कधीच विसरू शकत नाही, असं तिनं सांगितलं. प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर मंगळवारी आपल्या तीन विशेष महत्त्वाच्या भूमिकांचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये 2015 मधील संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील बाजीरावाची पत्नी काशीबाई ही भूमिका, 2012 मध्ये आलेल्या अनुराग बसू दिग्दर्शित बर्फी या चित्रपटातील झिलमिल या ऑटीस्टीक मुलीची भूमिका आणि 2011 मध्ये आलेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित सात खून माफमधील सुझाना या प्रेमाच्या शोधात भटकणाऱ्या स्त्रीची भूमिका यांचा समावेश आहे. प्रियांकानं यंदा मनोरंजन क्षेत्रातील 20 वर्ष पूर्ण केली असून या फिल्मच्या दिग्दर्शकांचं कौतुक केलं आहे. हे तीनही दिग्दर्शक म्हणजे स्वयंपूर्ण विद्यापीठं असल्याचं म्हटलं आहे. 80 फूट उंचावर बाल्कनीच्या रेलिंगवर तरुणी करत होती योगा; पाय घसरला आणि... तीन अत्यंत वेगळ्या अशा भूमिका मी साकारल्या. प्रत्येकाचा काळ वेगळा होता, प्रत्येक भूमिकेची खोली, पैलू वेगवेगळे होते. आव्हानात्मक अशा या भूमिका होत्या. या तीन दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभवही खूप काही शिकवणारा होता, असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ऐतराज, क्रिश, डॉन, फॅशन, बर्फी, मेरी कॉम, द स्काय इज पिंक या चित्रपटामधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. मेरी कॉम या बॉक्सर पटू मेरी कॉम हिच्या जीवनावर आधारीत चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकही मिळालं. दहा वर्षांचा काळ हिंदी चित्रपट सृष्टीत काढल्यानंतर प्रियांकानं हॉलिवूडकडे (Hollywood)आपला मोर्चा वळवला. 2015 मध्ये तिनं क्वांटिको या मालिकेत काम केलं. त्यानंतर दोन वर्षानी तिनं बेवॉच या इंग्रजी चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर प्रियांकानं ए कीड लाईक जेक, इजन्ट इट रोमँटिक आणि वी कॅन बी हिरोज या चित्रपटात काम केलं. ...आणि समुद्राने गिळली मारुती स्विफ्ट कार, तरुण-तरुणीला मस्ती पडली भारी, VIDEO सध्या ती आगामी चित्रपट टेक्स्ट फॉर यू या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसंच नेटफ्लिक्सवर द व्हाईट टायगर हा तिचा चित्रपट येत्या 22 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ती याची कार्यकारी निर्मातीही आहे. तिच्याबरोबर आदर्श गौरव आणि राजकुमार राव यांच्याही भूमिका आहेत. 2021 मध्ये तिचे वर्षभरातील तारखा बुक झाल्या असून, ती केन्यू रिव्हज बरोबर ‘ द मॅट्रिक्स 4’ हा चित्रपट करत आहे, रुसो ब्रदर्स समवेत अॅमेझोनवरील सिटाडेल ही थ्रिलर सिरीज, निक जोनास याच्याबरोबर ती सहनिर्माती असलेली संगीत ही सिरीज यामध्ये काम करत आहे. त्याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजसह भगवान ओशो रजनीश यांची शिष्या मा आनंद शीला यांच्या जीवनावर आधारीत एक चित्रपट निर्मिती करण्याच्याही तयारीत आहे.
    First published:

    Tags: Bollywood, Priyanka chopra

    पुढील बातम्या