लग्नानंतर प्रियांका चोप्रानं केला नावात बदल

अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नुकताच लग्न झालं आहे. लग्नानंतर रिसेप्शनदेखील झालं आहे. आता लग्नानंतर तिने तिच्या नावात बदल केला आहे. याबाबत सोशल मीडियावर तिने अपडेट दिले आहेत.

  • Share this:

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नानंतर दिल्लीमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांची रिसेप्शन पार्टी रंगली होती. प्रियांका आणि निकच्या रिसेप्शनसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती.

यानंतर प्रियांकानही तिच्या नावात बदल केला आहे ज्यामुळे आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. प्रियांकाने तिच्या आडनावासोबत सासरचंही आडनाव जोडलं आहे. याची माहिती प्रियांकानं इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

प्रियांकानं इन्स्टाग्रामवर 'प्रियांका चोप्रा जोनस' असं नाव टाकलं आहे. निक प्रियांकाच्या लग्नाबाबत अमेरिकेच्या मॅगझिननं प्रियांकाची बदनामी करणारा लेख प्रसारित केला होता. त्याबद्दल प्रियांकाने प्रतिक्रिया देत म्हणाली की, ती या प्रकाराला गांभिर्यानं घेत नाही. अमेरिकन मॅगझिननं या प्रकाराहबाबत जाहीरपणे माफी देखील मागितली आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं खरं प्रेम आहे की ते नाटक आहे, असा सवाल करत प्रियांकानं पैशासाठी लग्न केल्याचा दावा एका अमेरिकन मॅगझिननं एका लेखाद्वारे केला होता.

The Cut नावाच्या मॅगझिननं हा लेख प्रसिद्ध केला आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

स्त्रिया आणि फॅशन याबाबतचं हे नियतकालिक असल्याचा त्यांचा दावा आहे. स्त्रियांविषयीच्या मासिकातच प्रियांकाबद्दल असं लिहून आल्यामुळे वादाला तोंड फुटलं.

2100 शब्दांच्या या लेखात प्रियांका आणि निक यांच्या रिलेशनशिपबद्दल लिहिताना हॉलिवूडमध्ये आपली पत वाढवण्यासाठी प्रियांकानं हे लग्न केल्याचं म्हटलं होतं.

हा लेख प्रसिद्ध होताच यावर चौफेर टीका झाली. लिंगभेदी आणि वर्णभेदी लेख असल्यानं अनेकांनी निषेध केला.

गेम ऑफ थॉर्न्सची अभिनेत्री सोफी टर्नर हिनंही ट्वीट करून याचा निषेध केला. सोफी टर्नर निकच्या भावाची - जो जोनसची गर्लफ्रेंड आहे.

'निक, तू हा लेख वाचत असशील तर तातडीनं घोड्यावर टांग मारून तिथून पळून जा', असं या लेखातलं शेवटचं वाक्य होतं.

सोनम कपूरनंही कडक शब्दात या मॅगझीनवर टीका केली. स्वतःला स्त्रियांचं मासिक म्हणवणाऱ्यांकडून ही अपेक्षा नाही. हा लेख सेक्सिस्ट, रेसिस्ट आणि घाणेरडा असल्याचं सोनमनं लिहिलंय.

चहूबाजूनं अशी टीका झाल्यानं या मासिकानं अखेर हा लेख मागे घेतला. रीतसर माफीही मागितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 04:28 PM IST

ताज्या बातम्या