'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा जगातल्या 'मोस्ट पॉवरफुल विमेन'च्या यादीत समावेश

'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा जगातल्या 'मोस्ट पॉवरफुल विमेन'च्या यादीत समावेश

प्रियांका आता मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सामील झाली आहे. या यादीत तिच्यासोबत ऑपरा विनफ्रे, बियॉन्से, एलन डी जेनेरस, निकोल किडमन यांचाही समावेश आहे.

  • Share this:

'देसी गर्ल' अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्येही उत्कृष्ट अभिनयाची छाप पाडली आहे. त्यानंतर आताही तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे.

'देसी गर्ल' अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्येही उत्कृष्ट अभिनयाची छाप पाडली आहे. त्यानंतर आताही तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे.

2018 च्या डिसेंबर मध्ये प्रियांकानं अमेरिकन गायक निक जोनसशी जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांनी रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.

2018 च्या डिसेंबर मध्ये प्रियांकानं अमेरिकन गायक निक जोनसशी जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांनी रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.

प्रियांका बराच काळ बॉलिवूडपासून दूर असून सध्या ती आपल्या संसारात रमली आहे. मात्र 'द स्काय इज पिंक' पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

प्रियांका बराच काळ बॉलिवूडपासून दूर असून सध्या ती आपल्या संसारात रमली आहे. मात्र 'द स्काय इज पिंक' पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

प्रियांका 'द स्काय इज पिंक'चं शूटिंग पूर्ण करून नुकतीच आपल्या सासरी परतली. या सिनेमा pulmonary fibrosis पीडित आयशा चौधरी हिच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात प्रियांकासोबतच जायरा वसीम आणि फरहान अख्तर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

'मिस वर्ल्ड 2000' ते हॉलीवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. प्रियांकाच्या नावाचा समावेश आता यूएसए टुडेच्या जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत झाला आहे.

'मिस वर्ल्ड 2000' ते हॉलीवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. प्रियांकाच्या नावाचा समावेश आता यूएसए टुडेच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत झाला आहे.

प्रियांका आता मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत सामील झाली आहे. या यादीत तिच्यासोबत ओपरा विनफ्रे, बियांसे, एलन डी जेनेरस, निकोल किडमन यांचाही समावेश आहे.

प्रियांका आता मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सामील झाली आहे. या यादीत तिच्यासोबत ऑपरा विनफ्रे, बियॉन्से, एलन डी जेनेरस, निकोल किडमन यांचाही समावेश आहे.

मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत समावेश झाल्यावर 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना प्रियांका म्हणाली, 'या यादीत माझ्यासोबत ज्या महिलांचा समावेश आहे या सर्व महिलांना आपल्या आयुष्यात संघर्षाचा सामना केला आहे आणि म्हणूनच आज त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.'

मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश झाल्यावर 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना प्रियांका म्हणाली, 'या यादीत माझ्यासोबत ज्या महिलांचा समावेश आहे या सर्व महिलांना आपल्या आयुष्यात संघर्षाचा सामना केला आहे आणि म्हणूनच आज त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या