कोणी तरी येणार गं! देसीगर्ल प्रियांका चोप्रा देणार गुड न्यूज?

कोणी तरी येणार गं! देसीगर्ल प्रियांका चोप्रा देणार गुड न्यूज?

काही दिवसांपूर्वी प्रियांका ज्यावेळी मुंबईमध्ये आली होती त्यावेळी ती आई मधू चोप्रा यांच्यासोबत एका हॉस्पिटलच्या बाहेर दिसली होती.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीकडून ही अपेक्षा केली जाते की, तिनं लवकरात लवकर गुड न्यूज द्यावी आणि सेलिब्रिटींसाठीही हा नियम वेगळा नाही. डिसेंबर 2018 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर काही महिन्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बाबतीतही असंच झालं. तिच्या फोटोंवरून ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या. काही दिवसांपूर्वी प्रियांका ज्यावेळी मुंबईमध्ये आली होती त्यावेळी ती आई मधू चोप्रा यांच्यासोबत एका हॉस्पिटलच्या बाहेर दिसली होती. त्यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना आणखीच जोर चढला होता. शेवटी मधू चोप्रा यांनी या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगत त्यावर विराम लावला.

प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी सध्या तरी प्रियांका प्रेग्नंट नसल्याचं सांगितलं असलं तरीही भविष्यात काय होईल याचा खुलासा झाला आहे. प्रियांकाच्या प्रेग्नंसीबाबत भविष्यवाणी झाली असून यानुसार पुढील 24 महिन्यात प्रियांका आई होणार आहे. प्रियांकाबाबत ही भविष्यवाणी प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट संजय बी जुमानी यांनी केली आहे. जुमानी यांनी याआधीही प्रियांकाच्या लग्नाबाबतही अचूक अंदाज वर्तवला होता.

VIDEO : सेलिब्रिटींना नाचवणारे शूज येतात धारावीतल्या या कारखान्यातून

एस्ट्रो न्यूमरोलॉजिस्ट संजय बी जुमानी यांनी सांगितल्यानुसार प्रियांका चोप्रासाठी 9 नंबर सर्वात लकी आहे. देसी गर्लची डेट ऑफ बर्थ (18.07.1982)मध्ये तिची जन्म तारीख 81 यांची बेरीज 9 येते. ज्यावर्षी तिचा जन्म झाला त्यातही 9 हा अंक आहे. संजय जुमानींच्या मते, प्रियांकाचं वय 36 वर्षांपेक्षा जास्त असून 36 यांची बेरीज 9 हाच अंक येतो.

War मधील या HOT बिकिनी बॉडीसाठी वाणीनं घेतली होती अशी मेहनत, शेअर केलं सिक्रेट

प्रियांका 18 (18=9) व्या वर्षी मिस वर्ल्ड झाली होती. तिचे फॅशन आणि दोस्ताना हे दोन सिनेमासुद्धा तिच्या वयाच्या 27 (27=9) व्या वर्षी रिलीज झाले होते. तसेच तिचं लग्न सुद्धा 36 व्या (36=9) वर्षी झालं आहे. अशा अनेक योगायोग तिच्या आयुष्यात घडले आहेत.

भर पावसातही मलायका निघाली योगा क्लासला, दिसला नो मेकअप लुक

========================================================

VIDEO: 15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 11:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading