प्रियांका होणार 'आई'!

प्रियांका होणार 'आई'!

प्रियांकाचा लवकरच एक नवा सिनेमा येणार आहे. या सिनेमात ती एका सिंगल मॉमच्या भूमिकेत दिसणार आहे .

  • Share this:

21 जून:बॉलिवूड जिंकल्यावर हॉलिवूडमध्ये पाय रोवणाऱ्या प्रियांकाचा लवकरच एक नवा सिनेमा येणार आहे. या सिनेमात ती एका सिंगल मॉमच्या भूमिकेत दिसणार आहे .तसंच क्वान्टिको या मालिकेचंही शूटिंग ती करतेच आहे.

बेवॉचमधून प्रियांकानं हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन ती घरी आली पण प्रियांका जास्त दिवस स्वस्थ बसणाऱ्यातली नाही.

बेवॉचवर समीक्षकांनी कितीही ताशेरे ओढले असले तरीही प्रियांकाला 'ए किड लाईक जेक' हा दुसरा सिनेमा मिळालाच.

या सिनेमाची कथा एका 5 वर्षाच्या लहान मुलाभोवती फिरते ज्याला मुलींचे कपडे घालायला आवडतात. बिग बॅंग थिअरीतून प्रसिद्ध झालेला 'जिम पार्सन्स' आणि नटी 'क्लेर डेन्स' या सिनेमात  प्रमुख भूमिकेत दिसणारेत.आता या सिनेमाच्या शूटिंगमधल्ये काही फोटो वायरल झालेत. यात सिंगल मॉम प्रियांका खूपच सुंदर दिसतेयं .नारंगी रंगाचा टॉप आणि त्याला साजेसे डेनिमचे हाय हिल्स असं परफेक्ट कॉम्बिनेशन तिनं साधलय.

तर अशी स्टायलिश आई आपल्या मुलाला कसं सांभाळते हे चित्रपट आल्यावरच कळेल.

First published: June 21, 2017, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading