मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: प्रियांका चोप्राने घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांची मुलाखत; म्हणाली, 'दोघीही भारताच्या लेकी'

VIDEO: प्रियांका चोप्राने घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांची मुलाखत; म्हणाली, 'दोघीही भारताच्या लेकी'

कमला हॅरिस-प्रियांका चोप्रा

कमला हॅरिस-प्रियांका चोप्रा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. प्रियांकाने देशातच नव्हे तर जगभरात आपली खास ओळख निर्माण केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2 ऑक्टोबर-  बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. प्रियांकाने देशातच नव्हे तर जगभरात आपली खास ओळख निर्माण केली आहे. हॉलिवूड स्टार-गायक निक जोनससोबत लग्नानंतर प्रियांका विदेशात स्थायिक झाली आहे. ती सतत विदेशात विविध मोठमोठे शो होस्ट करताना दिसून येते.दरम्यान प्रियांका चोप्राने अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेत त्यांची खास मुलाखतदेखील घेतली आहे. अभिनेत्रीने नुकतंच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस अलीकडेच सरोगेसीद्वारे एका लेकीचे आईबाबा बनले आहेत. हे सेलिब्रेटी कपल सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहे. दोघेही मिळून लेक मालती मेरी चोप्रा जोनसचं संगोपन करत आहेत. जेव्हा प्रियांका आपल्या कामामध्ये व्यग्र असते तेव्हा निक मालतीची काळजी घेतो. आणि जेव्हा निक कामानिमित्त बाहेर असतो तेव्हा प्रियांका आपल्या मुलीची काळजी घेते. प्रियांका गेल्या काही दिवसांपासून आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये सतत व्यग्र आहे. नुकतंच प्रियांका चोप्रा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची मुलाखत घेण्यासाठी वॉशिंग्टन डीसीला गेली होती. प्रियंका ही मुलाखत व्हाईट हाऊसमध्ये घेणार होती, ज्यासाठी ती खूप उत्सुक दिसत होती.

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या जगभरातील चाहत्यांना आपल्या खाजगी आणि व्यावसायिक अपडेट्स देत असते. नुकतंच प्रियांका चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कमला हॅरिस यांच्या मुलाखतीदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये प्रियांका कमला हॅरिस यांच्यासोबत वॉशिंग्टन डीसीमध्ये दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रियांका कमला हॅरिस यांच्यासोबत अनेक विषयांवर संवाद साधताना दिसून आली. प्रियांकाने अनेक महत्वाच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकत कमला हॅरिस यांच्याकडून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रियांका आणि हॅरिस यांनी अमेरिकेत वेतन समानता आणि बंदूक बाळगण्याचा कायदा अशा ज्वलंत विषयांवरही संवाद साधला. यावेळी प्रियांका प्रचंड आत्मविश्वासाने प्रत्येक विषय हाताळताना दिसली.या मुलाखतीत प्रियंकाने आपल्यातील साम्य सांगत, आम्ही दोघीही भारताच्या लेकी असल्याचं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

(हे वाचा:Rashmika Mandanna: रश्मिकाला 'या' 2 अभिनेत्रींसोबत जायचंय रोड ट्रिपवर; नाव वाचून व्हाल चकित )

या मुलाखतीदरम्यान प्रियांकाने सुंदर असा पिवळ्या रंगाचा वेस्टर्न गाऊन परिधान केला होता. अभिनेत्रीने नेहमीप्रमाणे मोठ्या आत्मविश्वासाने आपला लुक कॅरी केला होता. प्रियांकाहे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यापासून प्रियांकाचं कौतुक केलं जात आहे. चाहते तिच्या पोस्टला भरभरुन दाद देत आहेत. तर दुसरीकडे तिला तिच्या लेकीबाबतही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे प्रियांका मुलाखतीमध्ये व्यग्र असताना, पती निक जोनस लेकीला सांभाळत होता. त्याचा एक फोटोसुद्धा समोर आला आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Priyanka chopra