5 वर्षांपासून प्रियांका चोप्राला तोंड द्यावं लागतंय 'या' आजाराला

नुकतंच प्रियांकानं तिच्या तब्येतीबद्दल एक गुपित शेअर केलंय.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2018 04:06 PM IST

5 वर्षांपासून प्रियांका चोप्राला तोंड द्यावं लागतंय 'या' आजाराला

मुंबई, 18 सप्टेंबर : प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. तिचा वाढदिवस असो नाही तर साखरपुडा... सध्या तर प्रियांका आणि निकचे एकत्र फोटोज खूप व्हायरल होतायत. नुकतंच प्रियांकानं तिच्या तब्येतीबद्दल एक गुपित शेअर केलंय.

प्रियांकानं सांगितलंय, ' मला दमा आहे. यात लपवण्यासारखं काहीच नाही.' एका जाहिरातीबद्दल तिनं ट्विट केलंय. त्यात तिनं म्हटलंय करियरमध्ये ध्येय गाठताना माझा अस्थमा म्हणजेच दमा आड आला नाही. मी 5 वर्षांची असतानाच मला दमा झाला.'

आपल्या ट्विटमध्ये प्रियांकानं म्हटलंय, 'माझ्या जवळच्या लोकांना माहीत आहे की मला दमा आहे. दमा माझ्यावर उलटण्याआधी मी दम्याला कंट्रोलमध्ये ठेवते. माझ्याकडे माझं इनलेहर असतं. त्यामुळे मला माझं करियर नीट करता येतं.'

Loading...

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...