Home /News /entertainment /

प्रियांका चोप्रानं फंक्शनमध्ये सर्वांसमोर केला मनिष मल्होत्राचा अपमान, VIDEO VIRAL

प्रियांका चोप्रानं फंक्शनमध्ये सर्वांसमोर केला मनिष मल्होत्राचा अपमान, VIDEO VIRAL

नुकत्याच पार पडलेल्या ‘उमंग 2020’मध्ये प्रियांकानं हजेरी लावली होती. या फंक्शनमधील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  मुंबई, 23 जानेवारी : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. लग्नानंतर ती परदेशात स्थायिक झाली असली तरीही बॉलिवूडच्या काही महत्त्वाच्या फंक्शनसाठी ती नेहमीच हजेरी लावताना दिसते. मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘उमंग 2020’मध्ये तिनं हजेरी लावली. यावेळी तिच्या साडीतील लुकची सोशल मीडियावर खूप चर्चाही झाली. पण या फंक्शनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात प्रियांकानं प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राचा अपमान केल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र पोलिसांसाठी आयोजित केला जाणारा उमंग 2020 हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या सोहळ्याला प्रियांकानंही हजेरी लावली होती. त्यावेळचा एक व्हिडिओ फोटोजर्नलिस्ट विरल भयानी यांनी शेअर केला आहे. या फंक्शनमध्ये पहिल्या रांगेत अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया, डायना पेंटी, मनिष मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि तब्बू हे कलाकार बसले होते. एवढ्यात प्रियांका तिथे आली आणि सर्वांना भेटली. पण तिथे असलेल्या मनिष मल्होत्राकडे मात्र ती सपशेल दुर्लक्ष करताना दिसते. प्रियांकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. दिशा पाटनीचा हॉट अवतार सोशल मीडियावर व्हायरल, पाहा PHOTO प्रियांका चोप्रा आणि मनिष मल्होत्रा खरं तर खूप चांगले मित्र आहेत. प्रियांका जेव्हाही मुंबईमध्ये येते तेव्हा ती नेहमीच तिच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. ज्यात मनिष मल्होत्राचा सुद्धा समावेश असतो. उमंग 2020 मध्ये प्रियांका चोप्रा व्यतिरिक्त, सलमान खान, सारा अली खान, कार्तिक आर्यन या कलाकारांनीही हजेरी लावली होती. ‘लव्ह आज कल’ रिलीजआधीच सारा-कार्तिकचे पर्सनल रोमँटिक चॅट झाले लीक
  View this post on Instagram

  💙

  A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

  प्रियांकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला तिचा स्काय इज पिंक हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही मात्र या सिनेमाचं समीक्षकांनी कौतुक केलं. लवकरच निक-प्रियांकाच्या संगीत सेरेमनीवर आधारित वेब सीरिज रिलीज होणार आहे. याशिवाय नुकतंच रिलीज झालेलं निक जोनससोबतचं तिचं What man gotta do हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं होतं. ‘अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवा', पाहा कोणावर भडकली कंगना
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Manish Malhotra'

  पुढील बातम्या