प्रियांका चोप्राच्या पतीला जवळपास 46 कोटींचं घर विकावं लागलं, कारण...

प्रियांका चोप्राच्या पतीला जवळपास 46 कोटींचं घर विकावं लागलं, कारण...

प्रियांका चोप्राचा पती निक जोनसनं त्याचं लॉस एंजेलिसमधील घर विकलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 ऑगस्ट : ग्लोबल स्टार बनलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी ड्रेसिंग स्टाइल तर व्हेकेशन अशा वेगवेगळ्या कारणांनी प्रियांकाच्या नावाची चर्चा सतत होत असते. पण सध्या तिची चर्चा होण्याचं कारण वेगळं आहे. प्रियांकाचा वाढदिवस असो की मग आणखी काही कारण असो प्रियांकाचा पती निक जोनस आपली लक्झरी लाइफस्टाइल मिरवण्याची एकही संधी सोडत नाही. पण नुकतीच या सेलिब्रिटी कपलच्या प्रॉपर्टीबाबत नवी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो.

एका मासिकनं दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाचा पती निकला त्याचं घर विकावं लागलं आहे. TMZ ने दिलेल्या माहितीनुसार निकनं त्याचं जुनं घर विकलं आहे. ज्या ठिकाणी निक लग्नाच्या अगोदर राहत असे. याशिवाय निक आपल्या क्वीनसाठी नवं अलिशान घर खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. नव्या घराचा शोध सुरू असून त्यांना अद्याप मनाजोगतं घर मिळालेलं नाही. निकनं नुकतंच विकलेलं हे घर लॉस एंजेलिसमध्ये होतं.

'तु खरंच लायक आहेस का?' वादग्रस्त ट्वीटवरून आतिफ असलमला नेटकऱ्यांनी झापलं

 

View this post on Instagram

 

It’s in the air.. ❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

या मासिकानं आपल्या रिपोर्टमध्ये रिअल इस्टेटच्या सूत्रांचा संदर्भ दिला आहे. यानुसार निकनं त्याचं जुनं घर 6.9 मिलियन डॉलर म्हणजे 48.91 कोटी रुपयांमध्ये विकलं आहे. या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, निकनं त्याचं हे घर एप्रिल 2018मध्ये 6.5 मिलियन डॉलरमध्ये म्हणजे 46.07 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. निकच्या या घरात 5 बेडरूम आणि 4 ते 5 बाथरुम आहेत. याशिवाय यामध्ये एक अलिशान पूल सुद्धा आहे.

सोनाक्षी सिन्हाला अटक झाल्याची बातमी खरी की खोटी? समोर आला हा VIRAL VIDEO

निक आणि प्रियांका नव्या घराच्या शोधात असून त्यासाठी त्याचं बजेट हे 20 मिलियन डॉलर म्हणजेच 141 कोटी रुपये असल्याचं या मासिकानं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय निकनं आपलं जुनं घार अद्याप सोडलेलं नाही पण तो लवकरच नव्या घरात शिफ्ट होईल असं म्हटलं जात आहे. हे स्टार कपल नेहमीच त्यांच्या फॅन्सी लाइफ स्टाइलसाठी चर्चेत असतं त्यामुळे आता त्यांचं नवं घर कसं असणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून राहीली आहे.

शाहरुखच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, पहिल्या फिल्मचं पोस्टर लाँच

=============================================================================

VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

Published by: Megha Jethe
First published: August 8, 2019, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading